खासगी नोकरी करण्यांचा पुढच्या महिन्यापासून पगार वाढलाच म्हणून समजा...

आरती औटी (यिनबझ टीम)
Wednesday, 10 July 2019
  • सरकारच्या निर्णयाचा खासगी नोकरदारांना होणार फायदा
  • ३ कोटी ६० लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होईल
  • पगारात २१० रुपयांनी वाढ होईल.

मुंबई : खासगी नोकरी करताय? तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सरकारच्या निर्णयाचा खासगी नोकरदारांना फायदा होणार आहे. त्यांच्या पगारात लवकरच वाढ होणार आहे. दरमाही पगारातुन कापण्यात येणाऱ्या रक्कमेत कपात करण्याचा निर्णय सरकारने कर्मचारी राज्यविमा अंतर्गत  घेतला आहे.

1 जुलै 2019 पासुन याची अंमलबजावणी सुरू केली असुन ऑगस्ट महिन्यापासुन खासगी नोकरदारांचा पगार वाढेल. येत्या ऑगस्टपासुन 21 हजारांपर्यंत पगार असणाऱ्या खासगी कर्मचार्यांना सरकारच्या निर्णयाचा फायदा होईल. कर्मचारी राज्य विमा (ESI) कायद्यानुसार आतापर्यंत खासगी नोकरी करणाऱ्यांच्या पगारातून ६.५ टक्के इतकी रक्कम कापली जात होती. यातील १.७५ टक्के हिस्सा कर्मचाऱ्याचा आणि ४.७५ टक्के हिस्सा कंपनीचा होता. मात्र यापुढे कर्मचाऱ्याच्या पगारातून ४ टक्के इतकीच रक्कम कापली जाईल. यातील ०.७५ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार १ टक्क्यानं वाढेल. याचा अर्थ २१ हजार पगार असलेल्यांच्या पगारात २१० रुपयांनी वाढ होईल.

सरकारच्या या निर्णयाचा फायदा खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ३ कोटी ६० लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होईल. याचा लाभ कंपन्यांनादेखील होणार आहे. आधी कंपन्यांना कर्मचाऱ्याच्या पगाराच्या ४.७५ टक्के इतकी रक्कम ईएसआयच्या अंतर्गत द्यावी लागायची; मात्र आता हे प्रमाण ३.२५ टक्क्यांवर आल्यानं कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. २१ हजारापेक्षा कमी पगार असलेल्या आणि १० पेक्षा अधिक कर्मचारी संख्या असलेल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना ईएसआयच्या नियमानुसार याचा फायदा घेता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News