खुशखबर! मुंबईकरांसाठी पालिकेने पार्किंगचे दर आणले निम्यावर ..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 13 July 2019
  • स्थानिकांसाठी पार्किंगचे दर निम्म्यावर
  • बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई​

मुंबई : महापालिकेने बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर महापालिकेच्या वाहनतळांवर स्थानिक रहिवाशांना निम्म्या दरात वाहने उभी करता येतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. 

वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांकडून हजार ते १० हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. महापालिकेचे वाहनतळ असलेल्या अनेक भागांत ५०० मीटरच्या आतील इमारतींमधील रहिवाशांकडूनही दंड वसूल केला जात आहे. या कारवाईमुळे स्थानिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात वाद होत आहे. काही ठिकाणी कारवाईविरोधात रास्ता रोकोही झाला. 

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार नगरसेवक, प्रभाग समिती अध्यक्ष समाधान सरवणकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना निवेदन दिले. स्थानिकांकडून सरसकट दंडवसुली न करता स्वतंत्र पार्किंग धोरण तयार करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्यानंतर स्थानिकांना निम्म्या दरांत पार्किंगची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

पार्किंगचे दर (एक ते २४ तास)
 तीनचाकी, चारचाकी वाहने : २५ ते ८० रु.
 दुचाकी वाहने : १० ते ३५ रु.
 ट्रक : ३५ ते २०५ रु.
 रिक्षा, टॅक्‍सी : २५ ते ८० रु.
 बस : २५ ते १४५ रु.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News