खूशखबर ! देशातल्या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी; असा करा अर्ज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी खुली होत आहे. SBIने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून व्हेकन्सीची माहिती दिली आहे. स्टेट बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासंदर्भात SBIने नोटिफिकेशन जारी केलं आहे. स्टेट बँकेत वरीष्ठ स्तरावरच्या 77 जागा भरायच्या आहेत.

 

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी खुली होत आहे. SBIने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून व्हेकन्सीची माहिती दिली आहे. स्टेट बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासंदर्भात SBIने नोटिफिकेशन जारी केलं आहे. स्टेट बँकेत वरीष्ठ स्तरावरच्या 77 जागा भरायच्या आहेत.

 

स्टेट बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशनमध्ये उपव्यवस्थापक आणि विशेष अधिकारी दर्जाच्या पदांची भरती होणार आहे. DGM आणि SCO या दोन पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 77 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर या पदांची आणि अर्ज कसा करायचा, कुठे करायची याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर त्यासाठी लॉगऑन करावं लागेल. SBIच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या पदांच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या साईटवरूनच ऑनलाईन अर्ज करायची सोय बँकेने उपलब्ध करून दिली आहे.

 

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, SCO आणि DGM पदांसाठी जागा भरण्याच्या प्रकियेला आज (ता. 22) जुलैपासून सुरूवात होत आहे. 12 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार कुठल्याही एकाच पोस्टसाठी अर्ज करू शकतात, अशी अट नमूद करण्यात आली आहे.

स्टेट बँकेची जी अधिकारी पदं भरायची आहेत, त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे;
Deputy General Manager: 1 post
SME Credit Analyst: 11 posts
SME Credit Analyst: 4 posts
SME Credit Analyst: 10 postsCredit Analyst: 30 posts
Credit Analyst: 20 posts

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवारांना SBIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागेल. त्यासाठी sbi.co.in या वेबसाईटवर SBI Recruitment 2019 या टॅबवर क्लिक करा. याशिवाय डायरेक्ट SBI vacancies असा सर्च देऊनसुद्धा या लिंकपर्यंत जाता येईल. Apply Online या टॅबवर क्लिक करून लॉगईन करा आणि आपली माहिती भरा. काळजीपूर्वक अर्ज भरल्यानंतर अर्ज करायची फीसुद्धा ऑनलाईन भरावी लागेल.खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी 750 रुपये अॅप्लिकेशन फी निर्धारित करण्यात आली आहे. General/OBC/EWS कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी एवढी फी लागू होईल. राखीव गटातल्या उमेदवारांसाठी अर्जशुल्कात सवलत देण्यात आली आहे SC/ST/PWD कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी 125 रुपये अॅप्लिकेशन फी द्यावी लागेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News