खुशखबर! एमबीबीएस पुर्ण होणार कमी खर्चात; बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • विद्यार्थ्यांना युक्रेन येथील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण कमी खर्चात पुर्ण करता येणार
  • "विद्यापीठात जवळपास १२०० विद्यार्थी भारतीय असून त्यात ७०० मुली शिक्षण शिकत आहेत.

नांदेड: गुणवत्ता असुनही आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणापासून वंचित राहतात. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण शिकण्याची इच्छा असणाऱ्या
विद्यार्थ्यांना युक्रेन येथील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण कमी खर्चात पुर्ण करता येणार आहे. एमबीबीएस अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रिया या विषयी बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे डीन डॉ. आय. जी. सवका यांनी मार्गदर्शन केले.
 

हॉटेल सिटी प्राइड येथे गुरुवारी (ता. १८) वैद्यकीय शिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. भारताचे अधिकृत प्रतिनिधी डॉ. सुनील शर्मा म्हणाले "बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा एमबीबीएस अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर भारतात वैद्यकीय सेवा देण्यासाठी एमसीआय स्क्रीनिंग परीक्षा पास होणे आवश्यक आहे. एमसीआय स्क्रीनिंग परीक्षेत पास होण्याचे सर्वांधिक प्रमान बुकोविनियन स्टेट मेडिकल विद्यापीतील विद्यार्थ्यांचे आहे.  
 

महाराष्ट्राचे अधिकृत प्रतिनिधी डॉ. अवधूत निरगुडे म्हणाले "विद्यापीठात जवळपास १२०० विद्यार्थी भारतीय असून त्यात ७०० मुली शिक्षण शिकत आहेत. विद्यापीठात संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत शिकवला जातो. मुल- मुलीसाठी विद्यापीठाचे स्वंतत्र वस्तीगृह आहेत. तसेच भारतीय शाकाहारी जेवणाची व्यवस्था  
आहे"

यावेळी बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीतच्या अधिकृत कार्यालयाचे उद्घाटन डॉ. आय. जी. सवका व डॉ. सुनील शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेला 100 हुन अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत भाग घेत आपला प्रवेश निश्चित केला.

 

"पाल्यांना वैद्यकीय शिक्षण द्यायचे म्हटल की, पालकांच्या कपाळावर आट्या पडतात. लाखो रुपयांचा शैक्षणीक खर्च सामान्य माणसाला परवडणारा नसतो. युक्रेन येथील बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत एमबीबीएसचे शिक्षण कमी खर्चात पुर्ण करता येणार आहे. बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एमबीबीएस करण्याची संधी उपलब्ध करून दिली व याचा लाभ घ्यावा"  
- डॉ. अवधूत  निरगुडे 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News