सैन्य भरतीसाठी तरुणांना सुवर्ण संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 September 2019
  • युद्धात जखमी झालेले सैनिक यांचे भाऊ, मुलगा तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.

बेळगाव: येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रातर्फे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. युनिट हेडक्वॉटर मुख्यालय कोटा अंतर्गत होणारी ही भरती केवळ मराठा इन्फंट्रीमधील आजी- माजी सैनिकांच्या नातलगांसाठी होणार आहे. 25 सप्टेंबरपासून भरती प्रक्रीयेला मराठा इन्फंट्री केंद्रातील शिवाजी स्टेडीयममध्ये सुरवात होणार आहे.

भरती मेळाव्यामध्ये सेवारत आणि निवृत्त सैनिक, वीरपत्नी, मयत माजी सैनिकाची पत्नी, युद्धात जखमी झालेले सैनिक यांचे भाऊ, मुलगा तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. सामान्य सैनिक (जीडी), ट्रेडमन, क्‍लार्क पदासाठी ही भरती असणार आहे.

दहावी, बारावी तसेच उच्य शिक्षण घेतलेले 21 वर्षाखालील उमेदवार यामध्ये भाग घेऊ शकतात. भरतीच्या ठिकाणी आपले शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र, आजी-माजी सैनिकांची मुले असल्याचे रिलेशन सर्टीफिकेट आदी कागदपत्रे आणि सध्याचे 12 रंगीत छायाचित्र सादर करावी लागणार आहेत. केवळ आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठीच ही भरती असणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News