श्रेयससाठी सुवर्णसंधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

‘मोदीजी की सक्‍सेस पार्टी’ या चित्रपटासाठी श्रेयसच्या नावाची वर्णी लागली आहे. त्यात तो माजी मंत्री लालकृष्ण अडवाणी यांची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता श्रेयस पार्डीवालाने ‘यारिया’, ‘सनम रे’, ‘स्विटी वेड्‌स एनआरआय’ यासारख्या मोजक्‍याच चित्रपटात काम केले. त्यानंतर तो ‘अकोरी’ या  वेबसीरिजमध्ये दिसला. आता पुन्हा एकदा तो हिंदी चित्रपटांकडे वळला आहे.

‘मोदीजी की सक्‍सेस पार्टी’ या चित्रपटासाठी श्रेयसच्या नावाची वर्णी लागली आहे. त्यात तो माजी मंत्री लालकृष्ण अडवाणी यांची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी त्याने लालकृष्ण अडवाणींच्या अनेक गोष्टींचे बारकाईने निरिक्षण केले.

त्यांचे अनेक व्हिडीओ बघून त्यांचं वागणं-बोलणं याचं निरीक्षण केलं आहे. याबाबत श्रेयस सांगतो, ‘मी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका फारच वेगळी आहे. यासाठी मी फार मेहनत घेतली आहे.’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News