सोन्याचा भाव चाळिसच्या पार जाणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली. सोन्याने प्रतिदहा ग्रॅमसाठी ३४ हजार ७०० रुपयांचा भाव गाठला आहे.

नवी दिल्ली - सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली. सोन्याने प्रतिदहा ग्रॅमसाठी ३४ हजार ७०० रुपयांचा भाव गाठला आहे. सोने ३५ हजारांजवळ पोचल्यानंतर त्यात किरकोळ घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकी फेडरलने व्याजदरकपातीच्या दिलेल्या संकेतानंतर सोन्याच्या भावात वाढ सुरूच आहे. 

येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्‍यता असून, वर्षअखेरपर्यंत सोन्याच्या भावात ३ हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव जून महिन्यात १९ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोचला आहे. १९ वर्षांपूर्वी जून महिन्यात सोन्याचा भाव १४३० डॉलरवर जाऊन पोचलाहोता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News