पिंच्याक सिल्याट राष्ट्रीय स्पर्धेत साताऱ्याच्या या खेळाडूंना सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

वाई : भोपाळ येथे झालेल्या पिंच्याक सिल्याट राष्ट्रीय स्पर्धेत राज्याच्या संघातील सातारा जिल्ह्यातील 12 व 14 वयोगटातील खेळाडूचे वर्चस्व राहिले. किर्णाक्षी किशोर येवले वाई (वय 10) हिने स्टानडिंग फाईट तुंगल, श्रवण सचिन लावंड खटाव (वय 10) याने तुंगल, व शिवतेज दिनेश पाटील कराड (वय 12) याने रेगु या खेळ प्रकारात सुवर्णपदके पटकाविली. या तिघांची सिंगापूर येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे

भोपाळ येथे 12 व 14 वयोगटातील मुलामुलींच्या सब ज्युनिअर पिंच्याक सिल्याट राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 31 राज्यातील 954 खेळाडूनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्र राज्य संघातून सातारा जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी उत्कृष्ट खेळ करीत तीन सुवर्णपदके मिळवली. त्यांना किशोर येवले, नितीन कांबळे, अनुज सरनाईक यांचे मार्गदर्शन लाभले. 

या खेळाडूचे पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष सुरेंद्र प्रतापसिंग, महासचिव किशोर येवले, जिल्हा अध्यक्ष निसार शेख, उपाध्यक्ष संतोष चौधरी, सचिव संजीव वरे, दीपाली येवले खजिनदार संदीप महागडे, चंद्रकांत कायगुडे, जाकेरा शेख या पदाधिका-यांनी केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News