गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी डॉ. प्रमोद सावंत-सुत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 18 March 2019

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर डॉ. प्रमोद सावंत याचं नाव होतं.  प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे विद्यमान सभापती आहेत. प्रमोद सावंत हे भाजपकडून सॅन्क्वेलिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. शिक्षणाने आणि व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

पणजी :गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर, आता गोव्याचे सूत्र कुणाच्या हातात सोपवले जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, मात्र मुख्यमंत्रीपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विधानसभेचे सभापती डॉ.प्रमोद सावंत याचं नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खात्रीलायक सु्त्रांनी दिली आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर डॉ. प्रमोद सावंत याचं नाव होतं.  प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे विद्यमान सभापती आहेत. प्रमोद सावंत हे भाजपकडून सॅन्क्वेलिम विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. शिक्षणाने आणि व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

गोव्याची सध्याची राजकीय परिस्थिती काय?

गोव्यात मार्च 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने 40 पैकी सर्वाधिक 17 जागा जिंकल्या. भाजपने या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. पण 2 अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी या दोन पक्षांच्या प्रत्येकी 3 आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला.
त्यंच्या अटीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात परतून मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यानुसार मनोहर पर्रिकर यांनी पुन्हा 14 मार्च 2017 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News