वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांना वह्या वाटप 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

डोंबिवली - अलीकडे पुण्यतिथीचे औचित्य साधून समाजासाठी चांगले काम हाती घेण्याचा प्रघात  पडत आहे.  डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर  येथील दत्तकृपा  टॉवर येथे राहणाऱ्या  चौधरी परिवारातील पवन चौधरी, सौरभ चौधरी,विकी चौधरी आणि व इम्परल ग्रुपने यांनी   आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब गरजू  असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून  मदतीचा हात पुढे केला आहे.  मोफत वह्या घेण्यासाठी  विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी झुंबड उडाली होती. 

सध्या शाळा सुरू झाल्याने वह्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे.  मात्र , काही पालकांना आपल्या पाल्याला नवीन वह्या घेऊन देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर चौधरी कुटुंबियांनी अशा हजारो विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.  कै अण्णा कुर्मा चौधरी यांचे 3 जून 2018 रोजी निधन झाले होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती.

त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी वह्या वाटपासह रक्तदान शिबीर, प्रबोधपर किर्तनाचेही आयोजन केले होते. चौधरी यांच्या मुलांनी समाजासमोर आणि आजच्या तरुण पिढीसमोर चांगला आदर्श निर्माण केला आहे असे मत  स्थायी समितीचे माजी सभापती जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त  केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News