जीवनदीप महाविद्यालयात भव्य दाखले वाटप शिबीर संपन्न

डॉ. राहूल तौर
Friday, 19 July 2019

कल्याण : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक व विद्यार्थी वर्गाला दाखले मिळविण्यासाठी १० ते१५ फेऱ्या तहसीलदार कार्यालयात माराव्या लागतात, त्यासाठी जीवनदीप महाविद्यालय गोवेली आणि तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन दरवर्षी जीवनदीप महाविद्यालयात केले जाते. दाखल्यामुळे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन रखडलेले प्रवेश व नागरिकांची अपुरी राहिलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी हे एकदिवसीय शिबीर ठेवण्यात येते.

कल्याण : तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी नागरिक व विद्यार्थी वर्गाला दाखले मिळविण्यासाठी १० ते१५ फेऱ्या तहसीलदार कार्यालयात माराव्या लागतात, त्यासाठी जीवनदीप महाविद्यालय गोवेली आणि तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दाखले वाटप शिबिराचे आयोजन दरवर्षी जीवनदीप महाविद्यालयात केले जाते. दाखल्यामुळे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन रखडलेले प्रवेश व नागरिकांची अपुरी राहिलेली कामे पूर्ण व्हावीत, यासाठी हे एकदिवसीय शिबीर ठेवण्यात येते. दाखले वाटप करताना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे मत कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी टिटवाळा, घोटसई, रायते, गोवेळी, कांबा, वरप आदी गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या एकदिवसीय शिबिराचा लाभ घेत असतात. यामध्ये उत्पनाचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला, जेष्ठ नागरिक दाखला, स्थानिक वास्तवयाचा दाखला व जातीचा दाखला मिळत असल्याने यावर्षी ही ४०० ते५०० नागरिक दाखले काढण्यासाठी आले असल्याचे चित्र दिसत होते.

या दाखल्याचे वाटप कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी आमदार किसनजी कथोरे यांच्या शुभ हस्ते दाखले  देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी,जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य के.बी.कोरे,उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,प्रा.प्रकाश रोहणे व जीवनदीप चे प्राध्यापक उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News