काश्‍मिरी तरुणांना रोजगार द्या, सर्व समस्या सुटतील ?

यीनबझ ऑनलाईन टिम
Monday, 25 February 2019

प्रोफेसर तलत अहमद : प्लेसमेंट देण्यासाठी पुढाकाराची गरज

नागपूर: जम्मू काश्‍मिरातील तरुण सैनिकांवर "पत्थरबाजी' करताना दिसतो. याशिवाय बरेच युवक दहशतवादी संघटनांसोबत जात असल्याचे सांगण्यात येते. या सर्व समस्यांचे मुळ तेथील युवकांमध्ये वाढती बेरोजगारी असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न मिटताच, या समस्यांही सुटतील असे मत श्रीनगर येथील काश्‍मीर विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तलत अहमद यांनी केले. 

प्रोफेसर तलत अहमद : प्लेसमेंट देण्यासाठी पुढाकाराची गरज

नागपूर: जम्मू काश्‍मिरातील तरुण सैनिकांवर "पत्थरबाजी' करताना दिसतो. याशिवाय बरेच युवक दहशतवादी संघटनांसोबत जात असल्याचे सांगण्यात येते. या सर्व समस्यांचे मुळ तेथील युवकांमध्ये वाढती बेरोजगारी असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न मिटताच, या समस्यांही सुटतील असे मत श्रीनगर येथील काश्‍मीर विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. तलत अहमद यांनी केले. 
पदव्युत्तर भूगर्भशास्त्र विभागातर्फे वनामती येथे शनिवारी (ता.23) आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादासाठी नागपूरला आले असताना पत्रकारांशी बोलत होते. प्रो. तलत अहमद म्हणाले, काश्‍मिरबद्दल प्रसार माध्यमांकडून बरेच काही दाखविण्यात येते. मात्र, तशी परिस्थिती जवळपास केवळ सिमेलगतच्या भागात आहे. तो भाग वगळल्यास जम्मू आणि काश्‍मिरमधील इतर परिसरात शांतता आहे. विशेष म्हणजे यावर्षी काश्‍मिरमधे पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्याबद्दल प्रसारमाध्यमाकडून कुठल्याच प्रकारची माहिती येत नाही. याउलट प्रत्येकवेळी शांतता नसल्याचे दाखवून तोही व्यवसाय ठप्प करण्यात येतो आहे. यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत आहे. जे विद्यार्थी शिकले त्यांना काम हवे आहे. ते मिळत नसल्याने पैसे घेऊन "पत्थरबाजी' केली जाते. शिवाय त्यांचा वापर सरकारविरोधात केल्या जात आहे. यावर उपाय म्हणून गतवर्षी प्लेसमेंट करण्यासाठी टाटा, बिरला आणि इतर मोठ्या कंपन्यांना काश्‍मिरमध्ये बोलाविण्यात आले होते. त्याद्वारे पंधराशे युवकांचे प्लेसमेंट करण्यात आले. हा आकडा कमी असल्याने समस्या सुटलेली नाही. मात्र, असे निरंतर होणे गरजेचे आहे. काश्‍मिर युवकांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात बोलताना या घटना कमी असताना, त्याबद्दल अधिक प्रसिद्धी देण्यात येत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर त्याही बंद होतील असे ते म्हणाले. विद्यापीठाबद्दल माहिती देताना, त्यांनी देशातल्या पहिल्या पंधरा विद्यापीठात असून येथेही दर्जेदार संशोधन होत असल्याचे सांगितले. 

युवकांना इतर राज्यात संधी मिळावी 

काश्‍मिरमध्ये रोजगार मिळत नसल्याने येथील शिक्षित तरुणांना इतर राज्यात नोकरी मिळावी यासाठी विद्यापीठ परिश्रम घेत आहे. यातून युथ एक्‍सचेंज प्रोग्राम राबवून देशातील इतर विद्यापीठातील वातावरण बघण्याची संधी देण्यात येत असल्याचे प्रो. तलत अहमद म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News