बायकोचा खून करण्यासाठी सुट्टी द्या

YIN BUZZ TEAM
Saturday, 26 January 2019

पटणाः बायकोचा खून केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी रजा हवी आहे, असे कारण लिहून ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मानवाधिकार आयोगाकडे पाठविले आहे. संबंधित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

पटणाः बायकोचा खून केल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी रजा हवी आहे, असे कारण लिहून ते पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद व मानवाधिकार आयोगाकडे पाठविले आहे. संबंधित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

दक्षिण बिहार ग्रामीण बॅंकेतील (बक्षता ब्रँच) मुन्ना प्रसाद यांनी पतंप्रधान, राष्ट्रपती व मानवधिकार आयोगाला रजेसाठी पत्र लिहीले आहे. रजेचे कारण दिले आहे की, 'बायकोचा खून करून तिच्यावर अंत्यंसस्कार करायचेत, त्यासाठी सुट्टी द्या, असे मुन्ना प्रसाद यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.' मुन्ना प्रसाद यांना पत्नी आजारी असल्याने तिच्यावर आठवड्यातून दोन वेळा डायलिसीस करावी लागते. बॅंकेत ते एकटेच असल्यामुळे रजा मिळत नव्हती. पत्नीवर उपचार करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्यामुळे त्यांनी अशा प्रकारे अर्ज करण्याचा मार्ग निवडला. बायकोचा खून करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त दोन दिवसांची सुट्टी द्या, असे अर्जामध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या रजा अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. सुटीवर जाऊन आल्यानंतर ते बॅंकेत रुजू झाले. पण, रजेचे कारणामुळे ते चर्चेत आले आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News