मराठी, देशमुखांना जातवैधता प्रमाणपत्रे द्या; खासदार हेमंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 7 July 2019

मराठी, देशमुखांना जातवैधता प्रमाणपत्रे द्या; खासदार हेमंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

यवतमाळ - शासनाने नुकतेच 12 टक्के आरक्षण शिक्षण व 13 टक्के आरक्षण नोकर्‍यांमध्ये जाहीर केले आहे. परंतु, मराठे, मराठी, देशमुख, मराठा-कुणबी, पाटील अशा प्रकारचे जातीबाबत उल्लेख असलेल्यांना मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास प्रशासकीय पातळीवर विविध अडचणी निर्माण होत आहेत. तरी, अशा आडनावांच्या मराठा बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी (ता. सात) पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

मराठा जात प्रमाणपत्र किंवा मराठा जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळविताना आडवानाला मराठे, मराठी, देशमुख, मराठा-कुणबी, पाटील अशा प्रकारचे नाव लागले असल्यास प्रशासकीय स्तरावर प्रमाणपत्र देण्याबाबत अडचणी निर्माण झाल्यामुळे अनेकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची तातडीने दखल घेऊन खासदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत तातडीने संबंधित विभागास निर्देश देण्याबाबत पत्र दिले आहे. वरील आडनावे असणारे सर्व बांधव हे मराठा जातीमध्येच मोडल्या जातात, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News