सरसकट कर्जमाफी द्या : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019
  • विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला

मुंबई : विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडला; परंतु हेच विखे आज ‘ठगां’मध्ये’ जाऊन कधी बसले तेच कळले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लगावला. शेतकऱ्यांची फसवणूक, थट्टा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली

पवार यांनी नवीन शिक्षणपद्धतीचे वाभाडे काढले. ही पद्धत विद्यार्थ्यांचे वाटोळे करणारी आहे, असेही अजित पवार म्हणाले. विनोद तावडे यांनी शिक्षणमंत्री असताना ही नवीन पद्धत आणली. त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी बाजूला केले आणि शेलारांना शिक्षणमंत्री केले आहे का?.  मंत्र्यांना वगळण्याचे कारण सभागृहाला कळायला हवे, असे पवार म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News