फ़्रेंडशिप 'डे'च्या निमित्तानं तुमच्या फ़्रेंड्सला द्या 'हे' हटके गिफ्ट्स

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 4 August 2019
  • मैत्रीला वयाची मर्यादा नसते. मैत्रीचं नातं हे सगळ्यात खास असतं. आयुष्यात मैत्री ही हवीच..! मैत्रीशिवाय जीवन व्यर्थ आहे. खरंतर मैत्रीचा असा कोणता दिवस नसतो कारण प्रत्येकक्षणी आपण मैत्री अनुभवत असतो त्याचा आनंद घेत असतो. मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेला प्रत्येक दिवस हा सेलिब्रेशनच असतं.

मैत्रीला वयाची मर्यादा नसते. मैत्रीचं नातं हे सगळ्यात खास असतं. आयुष्यात मैत्री ही हवीच..! मैत्रीशिवाय जीवन व्यर्थ आहे. खरंतर मैत्रीचा असा कोणता दिवस नसतो कारण प्रत्येकक्षणी आपण मैत्री अनुभवत असतो त्याचा आनंद घेत असतो. मित्र-मैत्रिणीसोबत घालवलेला प्रत्येक दिवस हा सेलिब्रेशनच असतं. 

मज्जा,मस्ती,रुसवे,फुगवे हे मैत्रीमध्ये आलेच..! मैत्री करण्यासाठी "फ्रेंडशिप डे" च पाहिजे असं नाही. आयुष्याच्या प्रवासात मित्र-मैत्रणीची तर पावलोपावली व्यक्तीला मित्राची गरज ही भासत असते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा फ़्रेंडशिप डे म्हणून साजरा करा. कारण आपली मैत्री किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही एका विशेष दिवसाची कधीच गरज भासत नाही. 

यंदा '४ ऑगस्ट' रोजी "फ्रेंडशिप डे" आहे. त्यासाठी तरुणांनी सुरुवातीपासून आजच्या मोर्डेन टेक्नॉलॉजीच्या जमान्यात मैत्रीचा ट्रेंड बदलत चालला आहे. "फ़्रेंडशिप डे"चे  खास सेलेब्रेशन करण्यासाठी अनेकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना देण्यासाठी ट्रेंडी गिफ्ट्स शोधत असतात. पण ते घ्यायला फार गोंधळ उडतो. की नक्की काय घ्यावं? या विचारात पडतो. तुम्ही जर गिफ्ट द्यायचा विचार करतायं तर आज आम्ही तुम्हाला गिफ्ट्सचे जरा हटके ऑप्शन सांगणार आहोत.

कोट्स बुक
आठवणींना उजाळा देण्यासाठी ही बुक खूप हटके गिफ्ट ठरेल. तुम्ही तुमच्या मित्रांच्या आवडीनिवडी जपून ठेऊ शकता. तसेच काही तुमच्यामधील मैत्रीचे ही किस्से यात लिहू शकता

फोटो फ्रेम
हे गिफ्ट सर्वात वेगळं ठरेल. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर घालवलेले खास क्षण कॅमेरामध्ये कैद केले असतील तर तुम्ही त्याची एक सुंदर फ्रेम करू शकता.  
 

पर्सनलाइज्ड कॉफी मग
या कॉफी मगवर तुम्ही एखादा फोटो किंवा एखादा छानसा "मैत्री"चा मेसेज तुम्ही लिहू शकता. 

कस्टमाइज पिलो
तुम्ही एखादी पिलो ही मस्त "कस्टमाइज" करून त्यावर तुमचा ग्रुप फोटो किंवा छानसा मेसेज लिहू शकता.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News