तीन पिढ्यांनी एकत्र केला गिरनार पर्वत सर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

कऱ्हाड : वयाच्या 80 व्या वर्षी मुलगा व नातवासमवेत गुजरातमधील 13 हजार पायऱ्यांचा गिरनार पर्वत सर करण्याची किमया येथील सदाशिवगडप्रेमी सुरेश जोशी यांनी केली. तीन पिढ्यांनी एकत्ररित्या पर्वत सर केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. निरोगी आरोग्यासाठी गडकोटांच्या वाटा चोखाळाव्यात, असा संदेशही श्री. जोशी यांच्याकडून देण्यात येत आहे.
 
येथील सदाशिवगडप्रेमी असलले श्री. जोशी 80 वर्षांचे आहेत. नुकताच त्यांनी गुजारातमधील गिरनार पर्वत सर केला. गड, किल्ल्यांच्या चढाईची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलगा सौरभ व नातू ईशान त्यांच्यासमवेत होता. एकाच वेळी तीन पिढ्यांनी हा पर्वत सर केला. वयाची 80 वर्षे झाली असली तरी आजवर डॉक्‍टरांना 80 रुपयेही दिले नसल्याचे सांगून गड-कोटांचीच ही किमया असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 
श्री. जोशी म्हणाले, ""आयुष्यात पैसा मिळवणे सोपे. पण, निरोगी आयुष्य मिळवणे अवघड आहे. त्यामुळे युवकांसह आबालवृद्धांनी गडकोटांच्या वाटा चोखाळल्या पाहिजेत. आरोग्य विकत मिळत नाही, ते मिळवावे लागते. दुसऱ्याचे आरोग्य कोणालाही चोरता येत नाही. त्यामुळेच आरोग्य मिळवण्यासाठी गडकोटांच्या वाटा चोखाळाव्यात. दरम्यान, येथील लोकशाही आघाडीने श्री. जोशी यांच्या या कामगिरीची दखल घेत लोकशाही आघाडीतर्फे श्री. जोशी यांच्यासह त्यांचा मुलगा सौरभ व नातू ईशान यांचा सत्कार केला. 

आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, पालिकेचे विरोधी गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक वैभव हिंगमिरे, शिवाजी पवार, सुहास इनामदार, जयंत बेडेकर, अमित शिंदे, महेश कदम, अनिल कदम, राहुल कदम आदी उपस्थित होते. सुभाष पाटील, जयंत पाटील यांनी या वेळी मनोगते व्यक्‍त केली. 
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News