येथील मुली सोडतात अर्ध्यातच शिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 14 August 2019

मेटपांजरा: काटोल तालुक्‍यातील काही गावात आजही एसटी सेवा योग्य वेळी उपलब्ध नसल्याने मुला-मुलींच्या शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम पडू लागला आहे. विशेषत: मुलींना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागत असल्याचे चित्र या भागात पहावयास मिळत आहे.  काटोल तालुक्‍यातील अनेक गांवात आजही पक्‍क्‍या रस्त्यांचा अभाव आहे. जेथे रस्ते आहेत तेथे त्याची दुर्दशा झाली आहे. आजनगाव-झिल्पा रस्त्याची झालेली दुरवस्था याचे जिवंत उदाहरण आहे.

रस्ता दुरुस्तीसोबतच या मार्गावर बससेवेची असलेली नागरिकांची मागणी लोकप्रतिनिधी दुर्लक्षित करत आहे. त्यामुळे या परिसराचा विकास खोळंबला आहे. आजनगांव झिल्पा मार्गावर कोणत्याही खासगी किंवा शासकीय प्रवाशी वाहतुकीची सोय नसल्याने नागरिकांचे हाल होतात. हा रस्ता म्हणायलाच डांबरी आहे. गेल्या आठ दहा वर्षांपासून संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. 

कोहळा, लाखोळीच्या विध्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी मेटपांजरा गाठावे लागते. आईवडील स्वखर्च व शिक्षकांच्या मदतीने बारावीपर्यंतचे शिक्षण मुलींना देतात. परंतु महाविद्यालयीन शिक्षणासाठी काटोलला जावे लागत असल्याने तेथे जाण्यासाठी गावातून बसव्यवस्था नसल्याने मुलींचं शिक्षण पालक तेथेच थांबवितात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News