"मुलींनो वेळ आली म्हणून सांगतो..."

सागर बारटक्के, सातारा
Sunday, 30 June 2019

स्त्रीच अस्तित्व सांगणारी कविता...

वेळ आली म्हणून या भावाला कडक शब्दात बोलणे गरजेचे वाटत आहे
पाश्चात्य संस्कृती अंगीकारल्यामुळे भारतीय संस्कृतीचं काळीज टरारा फाटत आहे...

अस म्हणतात, ताई-बाई-आई अशा मोहरून टाकनाऱ्या नात्याना जन्म देणारे अजब स्त्रीत्व आहे
जिच्यासाठी साक्षात परमेश्वरही भिकारी ठरतो, हेच का ते महान मातृत्व आहे...

या मातृत्वाचं महत्व तुम्हा आजच्या मुलींना काय कळणार
Live in relationship च्या नावाखाली सगळी नाती अशीच मावळणार...

दोष तुमचाच फक्त नाही त्यात पुरुषाचापण वाटा आहे
पन पुरुष जरि कुरूप असला तरि त्यास अलगद काढणारा तुम्हीच तो काटा आहे...

मुलींनो, आठवतंय, आपली आजी एकटी ५० माणसांच कुटुंब अस्सं घट्ट सांभाळयाची
अन अपेक्षा तुमची आज सासु-सासरे फक्त फोटोपुरते फिट्ट असावयाची...

लग्नातही पहा बेडपासून फ्रिजपर्यंत सगळकाही मिळूनही इच्छा नाही जात मागायची
आधीच्या काळी ५ भांड्यांची ५० करताना राव आख्खी हयात सरुन जायची...

लोकसंख्या नियंत्रणासारखी उत्तम बाब अन् मूलबाळांची गरज आता दत्तक घेऊन भागते 
पण तरी कसं समजावयाचं यांना मातृत्व विकत घेऊन नाही, समजत तर ते अनुभवायला लागते...

महिला निवारणासाठीच्या १७ कायदयांच्या गैरवापराने सासरकडच्यांचे जगणे मुश्किल झाले
अन् आजच्या अखंड सौभाग्यवतीला भाळी कुंकू लावनेही orthodox वाटु लागले..!!

मुलिनों हे orthodox विचार नसून ही भारतीय संस्कृती आहे
डोईवरला पदर सावरुन बनलेलि पहिली डौक्टर आनंदीबाई हीच स्त्रियांचि महती आहे...

सध्या तर कोणत्याही समारंभातही western कपडेच निवडतात
शरीर उघड़े टाकण्याला आजकाल सौंदर्य समजतात..!!

अरे अंग उघड़े टाकुन सौंदर्य कमावता येत असत तर
खडकाळ मातीवरला हिरवा साज पाहायला मिळेल का ?
संस्कार सांगणार्या भारतीय संस्कृतीच महत्व जगाला कळेल का ??

मुलिनों झाशीची राणीसुद्धा लढ़लि होती पाठी बाळ अन साड़ीचोळी नेसून
मग आजच्या मुलीच्या का दुखते पोटात कधीतरी साड़ी नेसली म्हणून...

आज बलात्काराच्या कित्येक घटनांना मुलीही तितक्याच जबाबदार आहे
साखर उघड़ी पडली असता मुंगीचे तिथे जाणे म्हटले तर स्वभावाचा आजार आहे..!!

अहो, घटस्फोटाच प्रमाण शिकलेल्या कुटुंबातही हूँ म्हणून वाढलय
जणु शिक्षणाचा टेम्भा संसारी मिरवुन समजूतदारपणाच गंजत पडलाय..

रबरबैंडसारख्या संसारात एकान ताणल की दुसऱ्यान सैल सोड़ायच असतय
संसार टिकवायचा असेल तर थोड़ा कमीपणा घ्यायला पण शिकायच असतय...

मुलिनों, तुम्ही डॉक्टर-इंजिनियर करून स्वतंत्र इच्छेच करियरही कराव
पण सासर-माहेरच्या माणसांना जपण हेही करियरचाच भाग मानाव...

अरे,माहेरात बहरुन सासरच्या अंगणी मांगल्याचा सड़ा घालणारी स्त्री असते
अखंड दुःखांचा झरा पचवनारी बलवत्तर हृदयाचीही स्त्रीच असते...

"अहो, खुप शिकुन सवरून आईबापाच नाव मोठ करायचं असत
जगाच्या उच्च शिखरावर पोचुनही स्त्रीच स्त्रीत्व जपायच असत...

अखंड नात्याना संभाळून संसाराला हळूहळू फुलवायच असत
"हयांचि-माझी"संपवुन "आपली माणस" समजुन "स्त्रीच अस्तित्व" घड़वायच असत"...

शेवटी बहिणीनो, अस म्हणतात गंजल्या गोष्टिना वापरात आणण्यासाठी "वंगण "असाव लागत...
अन घराला घरपण येण्यासाठी स्त्रीच्या अंगी ते साजरं "बाईपण" असाव लागत...

अखेरिस एवढंच म्हणेन, ईश्वराच्या स्त्री व पुरुष या दोन जाती खर तर "समंजस समानतेचा" अर्थ असतो
संस्कृती व कुटुंबव्यवस्था जपण्यासाठीच्या या कवितेमधे सांगा माझा कोणता स्वार्थ दिसतो???

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News