पुण्यातल्या तरुणी सुरक्षित आहेत का

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

पुणे  -  एका श्‍वानाला अपघात झाला म्हणून त्याला मदत करण्यासाठी माझी मुलगी बाणेरला गेली होती. त्यानंतर दुचाकीवरून ती घरी परतत होती. मित्राची गाडी पुढे होती. कोणीतरी पाठलाग करीत आहे, असे तिला वाटले; म्हणून ती रस्त्यावर थांबली आणि घाबरलेल्या अवस्थेत तिने मित्राला फोन केला. दरम्यान, मोटारसायकलवरून दोन मुले तेथे आली.

पुणे  -  एका श्‍वानाला अपघात झाला म्हणून त्याला मदत करण्यासाठी माझी मुलगी बाणेरला गेली होती. त्यानंतर दुचाकीवरून ती घरी परतत होती. मित्राची गाडी पुढे होती. कोणीतरी पाठलाग करीत आहे, असे तिला वाटले; म्हणून ती रस्त्यावर थांबली आणि घाबरलेल्या अवस्थेत तिने मित्राला फोन केला. दरम्यान, मोटारसायकलवरून दोन मुले तेथे आली.

मदतीच्या बहाण्याने ते तिच्याशी लगट करू लागले. स्वरक्षणार्थ मुलीने एकाला कानशिलात मारली. त्यामुळे दुसऱ्या मुलाने तिचे केस धरून डोके दुचाकीच्यास्पिडोमीटरवर जोरात आपटले. मुलीच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. तिचा आरडाओरडा ऐकून मित्र तेथे पोचला. त्याने त्या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही त्यांनी हल्ला केला. एकाने जवळची झाडाची कुंडी उचलून मुलीच्या डोक्‍यावर मारण्याचा प्रयत्न केला एकाने तिचा गळा दाबून धरला होता.

मुलीने चपळाईने त्या युवकांच्या मोटारसायकलची किल्ली काढून घेतली. त्यामुळे त्यांना पलायन करता येईना. त्यानंतर तिने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर २२-२५ मिनिटांनी गस्तीवरचे पोलिस तेथे पोचले. त्याच वेळी त्या युवकांनी त्यांच्या सात-आठ मित्रांना तिथे बोलावले. मात्र पोलिस दिसल्यावर त्यांना तेथे काही करता येईना. त्यानंतर पोलिसांनी युवकांना पोलिस ठाण्यात नेले.

तेथे तक्रार नोंदवून घेताना समोरच आरोपी युवक बसले होते. त्यांच्यात हास्यविनोद सुरू होते. आम्ही लगेचच बाहेर येऊ, अशी धमकी ते पोलिसांसमोरच देत होते. पहाटे पाचला फिर्याद दाखल केली. त्याची प्रत सकाळी अकरा वाजता देऊ, असे पोलिसांनी सांगितले. आठ तासांनी मुलांना जामीनही मिळाला. गुन्ह्यात पोलिसांनी योग्य कलमांचा समावेश केला नाही. याबाबत पोलिस आयुक्तांना भेटलो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News