ती मागणार नाही पण मनात पार्टनरकडून या अपेक्षा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019

आज आम्ही आपल्याला महत्वाच्या गोष्टी सांगत आहोत मुलींच्या मनात पार्टनरकडून काय अपेक्षा असतात. मुलींच्या मुलांकडून काय अपेक्षा असतात हा प्रश्न कठीण असला तरी जाणून घेणे आवश्यक आहे की मुली मुलांपेक्षा अगदी वेगळ्या स्वभावाच्या असतात. आपल्या योग्य पार्टनर व्हायचं असेल तर हे जाणून घेणे गरजेचं आहे.

आज आम्ही आपल्याला महत्वाच्या गोष्टी सांगत आहोत मुलींच्या मनात पार्टनरकडून काय अपेक्षा असतात. मुलींच्या मुलांकडून काय अपेक्षा असतात हा प्रश्न कठीण असला तरी जाणून घेणे आवश्यक आहे की मुली मुलांपेक्षा अगदी वेगळ्या स्वभावाच्या असतात. आपल्या योग्य पार्टनर व्हायचं असेल तर हे जाणून घेणे गरजेचं आहे.

सन्मानाची अपेक्षा
आपण जेव्हा तिच्यासोबत असता तेव्हा चारचौघात तिच्यावर चिडणे, तिला खाली पाडून बोलणे, स्वत:ला श्रेष्ठ समजून तिला महत्त्व न देणे ही आपली मोठी चूक ठरू शकते. उलट आपण तिला सन्मान दिल्यास तिला आपल्यावर गर्व वाटेल. आपल्या नात्यात प्रेम आणि आत्मविश्वास वाढेल आणि तीही तेवढ्याच सन्मानपूर्वक वागेल. कोणत्याही नात्यात सन्मान अत्यंत आवश्यक आहे. मुलींना देखील रिलेशनशिपमध्ये सन्मानाची अपेक्षा असते. 

दुर्लक्ष नको 
आपण व्यस्त असाल तरी फ्री झाल्यावर लगेच तिच्यासोबत क्वालिटी टाइम घालवल्याने तिचं आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे तिला कळून येईल. याने दोघांमधील बंधन घट्ट होतील. एकदा तिला हे कळल्यावर आपण व्यस्त असला तरी आपल्याला स्पेस देईल आणि विश्वासही कायम राहील. आपल्याला वेळ असल्यावर तिच्याशी बोलणे आणि वेळ नसल्यावर दुर्लक्ष करणे हे योग्य नाही. 

सॉरी म्हणायला शिका 
आपण बाहेर फिरताना आपला इतरांशी व्यवहार आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. प्रत्येकाशी वागताना विनम्रता असावी. आपल्या हातून चूक घडल्यास सॉरी म्हणायला शिका. अडिग स्वभावाचे लोक भविष्यासाठी धोकादायक असल्याचे मुलींना जाणवतात. यामुळे दुरावा निर्माण होऊ शकतो.

प्रामाणिकता
मुलींना प्रामाणिक मुलं पसंत येतात. आपल्या बोलण्यात आणि कतृत्वात समान व्यवहार दिसला पाहिजे. गैरव्यवहार मुलींना मुळीच आवडत नाही. या सर्व गोष्टी मुली स्वत:हून मागत किंवा सांगत नसल्या तरी त्या आपल्या वागणुकीवरून सगळं बारकाईने पाहत असतात.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News