भाऊ जेव्हा वेश्यालयात गेला तेव्हा समोर बहिणीला पाहून त्याला धक्काच बसला...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

कोलकात्यातील एक तरुणी एका मोठ्या कंपनीत काम करत होती. काही दिवसांपूर्वी ८ जूनला एक व्यक्ती तिला दिल्लीत अधिक चांगली नोकरी देतो असे सांगून दिल्लीला घेऊन आला.  घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची काहीही माहिती मिळाली नाही. बहिण सापडण्याची आशा मावळली असतानाच पीडित मुलीच्या भावाला एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला.

नवी दिल्ली: कोलकात्यातील एक तरुणी एका मोठ्या कंपनीत काम करत होती. काही दिवसांपूर्वी ८ जूनला एक व्यक्ती तिला दिल्लीत अधिक चांगली नोकरी देतो असे सांगून दिल्लीला घेऊन आला.  घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची काहीही माहिती मिळाली नाही. बहिण सापडण्याची आशा मावळली असतानाच पीडित मुलीच्या भावाला एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. त्याने त्याची बहिण दिल्लीतील जीबी रोड वेश्यालयात असल्याचे सांगितले. भाऊ जेव्हा वेश्यालयात गेला तेव्हा समोर बहिणीला पाहून त्याला धक्काच बसला. त्यानंतर दिल्ली महिला आयोगाने गुरुवारी (८ ऑगस्ट) दिल्लीतील जीबी रोडवरील वेश्यालयातून 27 वर्षीय एका सुशिक्षित तरुणीला मुक्त केले आहे. 

पीडित तरुणी कोलकात्याची असून ती कोलकाता येथे एका मोठ्या खासगी कंपनीत काम करत होती. तेथे तिची भेट ज्योत्सना नावाच्या एका महिलेशी झाली. त्यानंतर तिच्याशी मैत्री झाली. तिने 2 महिन्यांपूर्वी रमजान नावाच्या व्यक्तीची भेट घालून दिली. तो मला दिल्लीत अधिक चांगली नोकरी देतो म्हणून दिल्लीला घेऊन आला. दिल्लीला आल्यानंतर या व्यक्तीने मला जीबी रोड येथील वेश्यालयात विकले. 

मात्र, दिल्लीला पोहचल्यावर तिच्याकडून घरी कुणालाही फोन आला नाही. कुटुंबीयांनी फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा संपर्क होऊ शकला नाही. घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिची काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी कोलकाता पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

बहिण सापडण्याची आशा मावळली असतानाच पीडित मुलीच्या भावाला एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. त्याने त्याची बहिण दिल्लीतील जीबी रोड येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर भाऊ तात्काळ दिल्लीला आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीला भेटला. तो व्यक्ती ग्राहक म्हणून जीबी रोड येथे गेला होता. त्यावेळी तो बंगाली बोलत असल्याचे पाहून पीडित मुलीने त्याला मदत करण्याची विनंती केली आणि भावाचा मोबाईल नंबर देऊन त्याला सांगण्यास सांगितले होते.

बहिणीची माहिती मिळाल्यानंतर पीडित तरुणीच्या भावाने त्या व्यक्तीच्या मदतीने स्वतः ग्राहक बनत थेट जीबी रोडवरील वेश्यालय गाठले. तेथे त्याला जबरदस्तीने आणि फसवून वेश्या व्यवसायात अडकवलेली आपली बहिण भेटली. त्यानंतर पीडित तरुणीने आपल्यावर ओढावलेली सर्व आपबिती भावाला सांगितली. भावाने तात्काळ दिल्ली महिला आयोगाची मदत घेतली. दिल्ली आयोगाच्या सदस्या किरण नेगी यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पीडित तरुणीच्या भावासोबत पाठवले. दिल्ली आयोगाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने पीडित तरुणीला तेथून बाहेर काढले. तसेच तिचा जबाब घेऊन दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बलात्कार १५-२० लोक करत होते
येथे मला जबरदस्तीने देहव्यापार करायला लावण्यात आला. दररोज जवळपास 15-20 लोक माझ्यावर बलात्कार करत होते. एक दिवस एक बंगाली बोलणारा ग्राहक आला आणि मग त्याला माझी आपबिती सांगितल्यानंतर त्याने मदत केली.”

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News