गिरिराजसिंह यांना ‘जेडीयू’ची धमकी; पहा काय आहे कारण ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • राजकीय इफ्तार पार्ट्यांवरील वक्तव्य भोवले
  • (जेडीयू) ने​ यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली

पाटणा: विविध राजकीय पक्षांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्ट्यांबाबत आक्षेपार्ह ट्विट करणारे केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांना आज टीकेला सामोरे जावे लागले. ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’चा घटक पक्ष असणाऱ्या संयुक्त जनता दलानेही (जेडीयू) यावर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

गिरिराजसिंह यांनी त्यांच्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की या एवढ्याच उत्साहाने नवरात्रीच्या दिवशी सर्वांनी फलाहाराचे आयोजन करत त्याचे सुंदर फोटो आले असते तर ते चित्र किती सुंदर दिसले असते? आपल्या कर्म धर्मामध्ये आम्ही एवढे मागे का पडतो आणि दिखाव्यामध्ये मात्र पुढे का असतो?’’ हे ट्‌विट करताना गिरिराजसिंह यांनी पाटण्यामध्ये रविवारी जेडीयूने आयोजित केलेली इफ्तार पार्टी, आणि त्यानंतर लोकजनशक्ती पक्ष आणि हिंदुस्थान आवाम मोर्चाने आयोजित केलेल्या इफ्तार पार्ट्यांचे फोटो ट्‌विट केले आहे.

या छायाचित्रांत नितीश, रामविलास पासवान आणि जितनराम मांझी यांचे टोपी परिधान केलेले फोटोही असल्याने संयुक्त जनता दलाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘जेडीयू’ची धमकी
‘जेडीयू’चे नेते आणि राज्यमंत्री अशोक चौधरी म्हणाले, की नवरात्रोत्सवादरम्यान फलाहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यापासून गिरिराजसिंह यांना कुणी रोखले आहे का? मी भाजपला नाही पण गिरिराजसिंह यांना स्पष्ट शब्दांत इशारा देतो, की त्यांनी अशाप्रकारची वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News