गडकिल्ले आणि सगळच जाग्यावर; पण हरवलेला इतिहास !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 12 August 2019

गेली 5-6 वर्ष एक नवीन फॅशन आली आहे. तयार किल्ला विकत घेऊन त्यावर सैनिक मांडायचे. खरतर किरकोळ गोष्ट वाटते; पण यामुळे मुलांच्या विकासात अडथळा निर्माण होतोय अस नाही का वाटत?

गावभर फिरून दगडं गोळा करणे, शेतात जाऊन माती उकरून पोत्यात भरून ती सायकल वरून आणणे, सगळ्यांनी मिळून कोणता किल्ला करायचा याची चर्चा करणे, त्यानुसार सगळा प्लॅन आखणे, दगडांची रचना करणे, छ. शिवाजी महाराजांची जागा (सिंव्हासन) ठरवणे त्या जागेपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या करणे, कोणता मावळा कुठे ठेवायचा हे ठरवणे.

डोंगर दरी मुख्य दरवाजा, किल्ल्याभोवती खंदक,शेती , विहीर इत्यादी गोष्टी. किती खोल विषय आहे हा! नुसता खेळ नसून एक personality development चा कोर्स आहे. पण या ready made किल्ल्यामुळे हे सगळे विषय बंद होत आहेत आणि आई वडील पण आवडीनं हे सगळं आणून देतात. असंच जर झालं तर हळू हळू दगड, माती आणि मुलं नष्ट होतील.

हे थांबवायचे असेल तर आपणही या किल्ले बांधणीच्या प्रकियेत सहभागी होऊन आपल्या मुलांना शिवाजी महाराज कोण होते हे अगदी योग्य पद्धतीने सांगू शकतो! शिवाय मातीशी नातं टिकवणं हे हि तितकंच महत्वाचे नाही का?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News