नायगाव तहसिलसमोर घंटानाद आंदोलन : ईव्हीएम हटाव देश बचाव च्या घोषणा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

नायगाव : ईव्हीएम मशीन विरोधात नायगाव तहसील कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले . 

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम हटाव, देश बचाव असा कार्यक्रम राज्यात घेण्याच्या सूचना वंचितच्या कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. ते आंदोलन आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यामध्ये  वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकत्यांनी केले . 

नायगाव तहसील कार्यालयासोमरही हे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, लोकस्वराज्य आंदोलन आणि एम. आय. एम  या वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

त्यामध्ये  बी . के गायकवाड, उत्तम गवळे , अरुणकुमार सूर्यवंशी , रावसाहेबादादा पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले  होते . 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News