मराठा जात प्रमाणपत्र मिळवायंचय? या ठिकाणी मिळेल माहिती

निवृत्ती बाबर, (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019
  • गेल्या दोन वर्षात मराठा समाजाचे ५८ महामोर्चे निघाले. आरक्षणासाठी धडपडणाऱ्या मराठा समाजाला सरतेशेवटी न्याय मिळाला
  • व काही अटींवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मंजूर केले.

मुंबई - गेल्या दोन वर्षात मराठा समाजाचे ५८ महामोर्चे निघाले. आरक्षणासाठी धडपडणाऱ्या मराठा समाजाला सरतेशेवटी न्याय मिळाला. व काही अटींवर मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मंजूर केले. मराठा समाजाला जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी सकल मराठा समाज, मराठा कृती समिती जोगेश्वरी पूर्व यांनी प्रमाणपत्र काढताना कोणती कागद पत्र आवश्यक आहेत, याविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार दिनांक २३ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता विश्र्वावर्धीनी शिक्षण संस्था, मेघवडी पोलीस स्टेशन समोर, जोगेश्वरी पूर्व येथे केले आहे. 

आपण मराठ्यांच्या आजवरच्या मोर्चाचे फलित म्हणजे मराठा विद्यार्थ्यांचे आणि इतर नोकरदार वर्गासाठी जातप्रमाणपत्र, मिळकतीचा दाखला अशा अनेक अत्यावश्यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करण्याकरिता तसेच सध्या मराठा समाजाला लागू होणारे इतर आरक्षणाचे फायदे यावर मार्गदर्शन करण्याकरिता येत्या रविवारी सकल मराठा समाज, जोगेश्वरी पूर्व तर्फे मार्गदर्शन शिबिर घेण्यात येत आहे.

हे अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय अधिकारी, मराठा समन्वय तसेच इतर मान्यवर उपस्थित असणार आहेत. या अनमोल मार्गदर्शनाचा आपण सर्वच गरजू मराठ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, आपल्या शंका निरसन करून घ्यावे आणि आपल्या परिवारासहित आपली सध्याची खडतर, खर्चिक अशी वाटचाल भविष्यासाठी सोपी करून घ्यावी.

मार्गदर्शन शिबिर ठिकाण

  • विश्र्वावर्धीनी शिक्षण संस्था, मेघवडी पोलीस स्टेशन समोर, जोगेश्वरी पूर्व 
     
  • दिनांक - रविवार दि.२३ जुन २०१९
  • वेळ - सकाळी १०.०० वाजता

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News