प्रेयसीसाठी एक्स्प्रेसमध्ये ठेवल्या जिलेटीनच्या कांड्या; पत्रातून भाजपला धमकी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019

हावडा येथून बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झाली होती. त्यानंतर ही गाडी सफाईसाठी यार्डात गेली असता सफाई कर्मचाऱ्यांना या जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

मुंबई : प्रेयसीमुळे तरुणाने एक्स्प्रेमध्ये जिलेटीच्या काड्या ठेवल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या पाच कांड्या, एक पत्र, एका व्यक्तीचे छायाचित्रही घटनास्थळी आढळून आले होते. या पत्रामध्ये भाजप सरकारला धमकवण्यात आले होते.

यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. हा तरुण बुलढाणा येथील असून त्याने  प्रेमसंबंधातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

हावडा येथून बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झाली होती. त्यानंतर ही गाडी सफाईसाठी यार्डात गेली असता सफाई कर्मचाऱ्यांना या जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

यानंतर परिसर रिकामा करण्यात आला होता. रेल्वे पोलीस, कुर्ला रेल्वे पोलीस, टिळक नगर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि दहशतवादविरोधी पथकही दाखल झाले होते. या पाहणीनंतर तपास सुरु करण्यात आला होता. त्या तरुणाचे एका तरुणीशी एकतर्फी प्रेम होते. संबंधित तरुणीच्या पतीला या प्रकरणात गोवण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News