गायत्रीचे बालनाट्याकडे पाऊल..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

'निम्मा शिम्मा राक्षस’ या व्यावसायिक नाटकातून ती मराठी रंगभूमीवर पाऊल टाकणार आहे.

अभिनेत्री गायत्री दातारने ‘तुला पाहते रे’ मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. ही मालिका सध्या संपली असतानाच गायत्री व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहे.

‘निम्मा शिम्मा राक्षस’ या व्यावसायिक नाटकातून ती मराठी रंगभूमीवर पाऊल टाकणार आहे. ज्येष्ठ नाटककार रत्नाकर मतकरी आणि दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. राहुल भंडारे यांनी निर्मिती केली आहे.

हे एक बालनाट्य असून या नाटकाचे थ्रीडी स्वरूपदेखील प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. गायत्री या नाटकात मुख्य भूमिकेत असून ती या नाटकात शहजादीची भूमिका साकारणार आहे. येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News