यवतमाळचा सुपुञ गगनसिंह चौहानची भारतीय नौसेनेत वर्णी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 21 July 2019

यवतमाळ: देशाचे संरक्षण करणाऱ्या जल, थल किंवा वायु या तीन पैकी कोणत्याही दलाच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या येथील गगनसिंह मदनसिंह चौहान या तरुणाची भारतीय नौसेनेत (नेव्ही) वर्णी लागली आहे.  

यवतमाळ: देशाचे संरक्षण करणाऱ्या जल, थल किंवा वायु या तीन पैकी कोणत्याही दलाच्या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या येथील गगनसिंह मदनसिंह चौहान या तरुणाची भारतीय नौसेनेत (नेव्ही) वर्णी लागली आहे.  

ओडिसा राज्यातील चिल्का आय. एन. एस. प्रशिक्षण सेंटरमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.    मागील सात महिन्यापूर्वी, भारतीय नौसेनेच्या (नेव्ही) भरतीसाठी, महाराष्ट्रातून १२०० तरुणांनी परीक्षा दिली होती. त्यातून फक्त १२ तरुण उत्तीर्ण झाले होते. त्या बारा मध्ये यवतमाळच्या गगनसिंहाचा समावेश होता. सर्व परीक्षा आणि चाचण्यांमध्ये गगनसिंह उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे सिलेक्शन झाले. त्यानंतर ओडीसा राज्यातील चिल्का आय. एन. एस. प्रशिक्षण सेंटर मध्ये त्याला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. 

त्याचा सहा महिन्यांचा प्रशिक्षणाचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला असून, पुढील प्रशिक्षणासाठी आता मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. गगनसिंह हा यवतमाळ पोलीस विभागात कार्यरत असलेल्या मदनसिंह चौहान यांचा सुपुत्र व  पत्रकार रघुवीरसिंह चौहान यांचा पुतण्या आहे. भारतीय नौसेनेतून (नेव्ही) देशसेवा करण्याचे त्याने बाळगलेले स्वप्न साकार होणार आहे. गगनसिंहाच्या या यशाबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News