गारेगार असलेला गोडगोड गुलाबाचा सरबत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019

साहित्य 

  • गुलाबाची ताजी फ़ुले (देशी, सुगन्धी) - 20
  • साखर -1 किलो
  • पाणी - 1/2 लिटर

कृती
रोझ सिरप

साहित्य 

  • गुलाबाची ताजी फ़ुले (देशी, सुगन्धी) - 20
  • साखर -1 किलो
  • पाणी - 1/2 लिटर

कृती
रोझ सिरप

  1. गुलाबाची फ़ुले स्वच्छ धुऊन माठातील / फ़्रीझमधील थंडगार पाण्यात 10 मिनिटे भिजवून ठेवावी
  2. एका मोठ्या भांड्यात पाकळ्या आणि पराग काढून घ्यावे.
  3. आता यात 1/2 लिटर पाणी घालून गॅसवर गरम करायला ठेवावे. भांड्यावर घट्ट बसणारे झाकण ठेवावे जेणेकरून वाफ बाहेर येणार नाही.
  4. पाकळ्यांचा रंग पांढरा झाला कि (याला साधारण 5-7 मिनिटे लागतात) gas बन्द करून झाकण न काढताच हे गुलाबपाणी थंड होऊ द्यावे (4 ते 5 तास) . असे केल्याने गुलाबांचा पूर्ण अर्क पाण्यात उतरतो.
  5. हे थंड झालेले गुलाबपाणी एखादे सुती कापड वापरून गाळून पाकळ्या घट्ट पिळून घ्यावा.
  6. आता या पाण्यात साखर घालून एकतारी पाक होईपर्यंत उकळी आणावी.
  7. थंड झाल्यावर बाटलीत भरुन ठेवावे.
  8. रोझ सिरप तयार आहे.

सरबत करण्यासाठी ग्लासभर पाण्यात 2 चमचे सिरप घालून छान डायल्युट करून घ्यावे. आवडत असल्यास लिंबाची फोड पिळून आणि 1-2 पुदिन्याची पाने खलून घालावीत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News