सतत दरोडा घालणारी तरुणांची टोळी पोलिसांनी केली जेलबंद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • व्यापारी उमेश पिसे हे गोव्याहून कोल्हापूर कड़े जाताना अज्ञात इसमानी त्यांची गाडी आडवली
  • 1 लाख 90 हजार रूपये रोख आणि 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते
  • अपहरण करणारे सर्व इसम तरुण वर्गातले आहेत

सावंतवाडी: हातकनंगले येथील व्यापारी उमेश पिसे हे गोव्याहून कोल्हापूर कड़े जाताना अज्ञात इसमानी त्यांची गाडी आडवली. त्यांच्या कडील 1 लाख 90 हजार रूपये रोख आणि 12 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. तसेच पिसे यांचे अपहरण करून नंतर त्यांना बेळगांव येथे सोडले होते. अपहरण करणारे सर्व इसम तरुण वर्गातले आहेत. या सर्व संशयित तरुणांना अटक करून आज सावंतवाडी येथील न्यायालयात हजर केले. त्यांना सतरा पर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या दरोड्याचा तपास करून 5 आरोपीना जेरबंद करण्यात आल्याची माहीती जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यानी दिली. तर यातील फरारी असलेला एक संशयित पोलिसात असल्याचे समजते या तपासाचा अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक निमित गोयल, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक प्रल्हाद पाटील, सावंतवाड़ी पोलीस निरीक्षक धनावडे यांच्या सह काही पोलीसानी एक महिन्यात संशयित आरोपींचा लावला छडा लावला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News