पूरग्रस्तांना अधिकाऱ्याची अनोखी मदत; चक्क डोक्यावर नेले तांदळाते पोते

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019
  • अधिकारी पादाच्या आत माणूसकीचा झरा
  • दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्याचे तहसिलदार गणपती शास्त्री यांनी चक्क स्वत:च्या डोक्यावरुन तांदळाचे पोते वाहून नेले होते.

बंगळुरू: मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात पूरान थैमान माजवलं आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. तन, मन, धन देऊन अनेक नागरिकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. प्रशासनाचे कर्मचारी प्रत्यक्ष मदतीसाठी सर्सावले आहेत.

कर्नाटक राज्यातील काही भागांत पूर आला आहे. त्यामुळे तेथे मोठे नुकसान झाले आहे. एनडीआरएफ आणि सैन्याच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हजारो नागरिकांचे जीव वाचवले. तर, लाखो नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचवले आहे. पूरग्रस्त भागात मदतकार्य जोमाने सुरू असून अन्नधान्यापासून ते सर्वच अत्यावश्यक वस्तूंची मदत पोहोचविण्यात येत आहे.
   
दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील बेल्थानगडी तालुक्याचे तहसिलदार गणपती शास्त्री यांनी चक्क स्वत:च्या डोक्यावरुन तांदळाचे पोते वाहून नेले होते. नागरिकांना ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात एक पुल बांधण्यात आला होता. त्या पुलावरून तहसिलदार गावातील लोकांना जीवनवश्यक वस्तू तसेच तांदळाचे पोते पहचवण्याचे काम करत होते. आपल्या पदाचा कुढलाही मोठेपणा न करता प्रमाणिक पणे पूरगस्तांना मदत करत होते. अधिकारी पादच्या आत माणूसकीचा झरा असतो याचे दर्शन यावेळी पहायला मिळाले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News