दयानंद कला महाविद्यालयात गांधी जयंतीनिमीत्त स्वच्छता मोहिम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 October 2019
  • दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.

लातुर - दयानंद कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाच्या सर्व क्लासरुम, ग्रंथालय, ॲनिमेशन, फॅशन विभाग, प्रशासकीय सेवा विभाग या सर्व रूम साफ केल्या. 

तसेच दयानंद शिक्षण संस्थेचा 22 एकर परिसर प्लास्टिक मुक्त करण्यात आला. या अभियानास दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री. रमेश बियाणी, सहसचिव मा. श्री. सुरेश जैन यांनी अभियानास भेट देऊन स्वतः स्वच्छता अभियानात सामील झाले. या अभियानामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी.गायकवाड, उपप्राचार्य अनिल माळी, पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील एनएसएस, एनसीसी, विद्यार्थी मंडळ व कनिष्ठ महाविद्यालयातील 283 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

हे अभियान यशस्वी करण्यामध्ये रासेयो, लातूर जिल्हा समन्वयक डॉ.संतोष पाटील, कार्यक्रमाधिकारी डॉ. अंजली जोशी, डॉ. शिवकुमार राऊतराव, डॉ.संदीप जगदाळे, प्रा.विलास कोमवाड, प्रा. महेश जंगापल्ले, प्रा. झापले, डॉ.प्रदीप सूर्यवंशी, प्रा.बालाजी गुटे, कार्यालयीन अधीक्षक श्री. नवनाथ भालेराव, श्री देशमुख यांच्यासह श्री.विष्णू चांदुरे, श्री.भरत पवार, श्री.मुंडे परमेश्वर या विद्यार्थ्यांनी ही परिश्रम घेतले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News