गेम : लहानपणाची एक आठवण

कृष्णा ठोंबरे
Friday, 14 June 2019

आपण सगळ्यांनी लहानपणी कॉन्ट्रा, मारिओ आणि सुपर स्टार फोर्स असे वेगवेगळे गेम खेळायचो. चला तर बघुयात अशा काही गेमची माहिती, जे नविन ग्राफिक आणि लूक्ससोबत पुन्हा आपल्या मनोरंजनसाठी परतले आहेत.

आपण सगळ्यांनी लहानपणी कॉन्ट्रा, मारिओ आणि सुपर स्टार फोर्स असे वेगवेगळे गेम खेळायचो. चला तर बघुयात अशा काही गेमची माहिती, जे नविन ग्राफिक आणि लूक्ससोबत पुन्हा आपल्या मनोरंजनसाठी परतले आहेत. 

कॉन्ट्रा रोग कॉर्पस 

या गेममधे आपल्याला झोम्बी दिसतात. यात हिरोचे नाव केझर आहे आणि त्याचाकडे नवीन हत्यार ड्रिल मशीनचा हाथ, नवीन बंदूक जे एक वेळेस ४ मिसाइल फायर करत आहे.

यात दुसऱ्या हिरोच नाव हंगरी बिष्ट आहे. जो एक सायंटिस्ट होता आणि त्याचा अवतार पांडा सारखा आहे. तो पूर्णपणे रोबोट सारखा आहे ज्याकडे खूप ताकद आणि डोकं आहे.

यात तिसरी हेरॉईन मिस हाराकिरी आहे. जी एक एलियन आहे. तिच्याकडे लेझर पॉवर आणि फायर पॉवर आहे.

चौथा हिरो हा एलियन  आणि माणसाचा संलग्न आहे. यांच्याकडे आग आणि नाचायची टाकत आहे.

पाचवी हेरॉईन एरो कॅप्टन आहे.  जी एक लहान मुलगी आहे. तिच्याकडे हेलिकॉप्टर आणि उडायची ताकद आहे.  

 

हॅलो कम्स टू सी ऑफ थिव्हस

हा गेम पायरेट काळावर आधारित आहे. या एका पायरटेची कथा आहे, जो अदृष्य असल्याचे आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळते.

या गेममध्ये आपल्याला जुन्या काळातील बंदुकी, तलवार आणि नवीन जुन्या काळातील जहाज बघायला मिळतील.

या गेममध्ये आपल्याला एका पायरेटच आयुष्य जगायला मिळेल आणि यात स्पार्टन जहाज पण मिळेल. चला तर करूया प्रवास समुद्राचा.. 

डुम इटर्नल 

या गेममध्ये तुम्हाला दानव मारणाऱ्या तरबेज हिरोची भूमिका अनुभवायला मिळेल.

यात आपल्याला नवीन हत्यार जस आग फेकणारी बंदूक, मशिन गन, शॉट गन, कोल्हा, वेगवेगळे दानवसुद्धा बघायला आणि मारायला मिळतील.

तर चला निघुया एका न संपणाऱ्या प्रवासावर जगाला वाचवण्यासाठी.

फॉलआऊट 76

या गेममध्ये 52 प्लायर्स खेळू शकतील.  प्रत्येकी 4 च्या गटा मध्ये हा गेम खेळता येतो.

यात उडणारे दानव आहेत जे ड्रॅगनप्रमाणे आग फेकू शकतात.

यात आपण कॅम्प बांधू शकतो. प्लेअरविरुद्ध मशीनसुद्धा खेळू शकतो. यामध्ये प्रत्येकाला विशेष शक्ती मिळते, जो सगळ्या गेम पेक्षा एक वेगळा अनुभव असेल.

यात स्निपेर, शॉट गन, मशीन गन, अणुबॉम्ब सुद्धा आहेत. यात नवीन कपडे, शक्ती आपण जिंकून मिळवू शकतो.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News