युवकांच्या भविष्याचा कचरा झालाय: अमोल कोल्हे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 16 October 2019
  • तरुणांच्या भविष्याचा झालेला कचरा त्याचे काय करायचे, याचे उत्तर सरकारने द्यावे. ही उत्तरे दिली नाहीत म्हणूनच महाराष्ट्रातील तरुणांनी 'गो बॅक' असा नारा दिला,' अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी यवत येथे केली.

यवत: नुकत्याच निवडणुका जवळ आलेल्या असून प्रत्येक उमेदवार हा आपापल्या प्रचाराच्या मग्न आहेत. खासदार अमोल कोल्हे यांचे मित्र रमेश थोरात हे महाआघाडीचे उमेदवार आहेत.

रमेश यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे हे यवत येथे आले होते. यावेळी देशाचे पंतप्रधान जर स्वच्छता मोहीम करत असतील तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. परंतु, दुसरीकडे देशात वाढत जाणारी बेरोजगारी, शेतकऱ्यांची होणारी दैन्यावस्था, तरुणांच्या भविष्याचा झालेला कचरा त्याचे काय करायचे, याचे उत्तर सरकारने द्यावे. ही उत्तरे दिली नाहीत म्हणूनच महाराष्ट्रातील तरुणांनी 'गो बॅक' असा नारा दिला,' अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली.

त्यासोबतच कोल्हे पुढे म्हणाले की, 'पाच वर्षापूर्वी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशा जाहिराती करून भाजप सत्तेत आली. परंतु, त्यांची सर्वोत्तम कामगिरी कुठेही दिसली नाही. आजची खरी परीस्थिती जर पाहायला गेलो तर, पाच वर्षांत सोळा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सोळा हजार माता भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले जाते, सोळा हजार बालके अनाथ होतात. ही तुमची सर्वोत्तम कामगिरी आहे का? तुम्ही महाराष्ट्राच्या भवितव्याचे मारेकरी आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे मोठ मोठे नेते इथे आखाडा खोदायला येतात का? असे अनेक सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर प्रतीउत्तर देताना केले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News