अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत अभियांत्रिकी पदविकेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

कऱ्हाड :  दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी यापूर्वी राखीव असणाऱ्या 20 टक्के जागा यंदा शासनाने दहा टक्के केल्या. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत अभियांत्रिकी पदविकेच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

दहावीनंतर अनेक विद्यार्थी तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेतात. काही जण पदविका घेऊन पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतात. गेल्या वर्षापर्यंत तंत्रशिक्षण पदविका करून पदवी अभियांत्रिकीला प्रवेशासाठी 20 टक्के राखीव जागा होत्या. यावर्षी अचानकपणे शासनाने त्यात बदल करत तो कोटा 10 टक्के केला. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्या निर्णयाच्या निषेधार्थ अभियांत्रिकीच्या पदविकेच्या विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून व्यथा मांडल्या. दत्त चौकातून मोर्चास सुरवात झाली. तेथून भेदा चौक मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. तेथे विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. या वेळी नायब तहसीलदार विजय माने यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस व सातारा जिल्हा एनएसयुआयचे शिवराज मोरे, प्रतापसिंह पाटील, दिग्विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, गोल्डन पवार, इंद्रजित भोपते, अमित पाटील, अकीब पटेल, अक्षय जाधव, अथर्व पाटील, अतिष पाटील, अभिलाष पाटील, धार्मिक शहा, हर्षवर्धन माने, अनिकेत बटाणे, साईराज ठोंबरे यांच्यासह विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News