राजकारणातील बेडूक उड्या आणि नितीन नांदगावकरांचा शिवसेना प्रवेश

शुभम शिंदे
Thursday, 3 October 2019

महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे आणि या रणधुमाळीत 'स्वतःचा बळी न जाता आपल्या हिश्याचं मैदान काबीज करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींनी पक्षनिष्ठा वगैरे सारख्या गोष्टी बाजूला सारत बेडूकउड्या मारायला सुरुवात केलेली आहे. परंतु यातील सर्वच बेडकांच्या उड्या ह्या स्वार्थापोटी झाल्यात का? की ह्या मागे सुद्धा काही पडद्यामागील राजकारण आहे? 

महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे आणि या रणधुमाळीत 'स्वतःचा बळी न जाता आपल्या हिश्याचं मैदान काबीज करण्यासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींनी पक्षनिष्ठा वगैरे सारख्या गोष्टी बाजूला सारत बेडूकउड्या मारायला सुरुवात केलेली आहे. परंतु यातील सर्वच बेडकांच्या उड्या ह्या स्वार्थापोटी झाल्यात का? की ह्या मागे सुद्धा काही पडद्यामागील राजकारण आहे? 

25 जुलै 2019 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला. (आणि याच दिवशी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची वरळी मतदार संघातील उमेदवारी पक्की झाली.) राष्ट्रवादी सरकारच्या काळात सचिन अहिर यांनी मंत्रीपद भूषवल आणि आज राष्ट्रवादी विरोधी बाकावर असताना सुद्धा शरद पवार यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक असणाऱ्या सचिन अहिर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष हे मोठं पद दिल.

तरीसुद्धा निष्ठावंत सचिन अहिर यांनी पवारांशी गद्दारी का केली? सचिन अहिर सेनेत जाणार याची कल्पना शरद पवार यांना नव्हती का? की यामागे देखील मास्टरमाइंड पवारांची काही खेळी होती? (पवारांची ही खेळी समजण्यासाठी सुप्रिया सुळेंची 2004 मधील पहिली निवडणुक समजून घ्यावी लागेल) 2004 मध्ये  सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यावेळी निवडणुकीत उतरताना सुप्रिया सुळेंनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला. बाळासाहेबांनी आशीर्वाद रूपात सुप्रिया सुळेंना समर्थन देत त्यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा न करण्याची घोषणा केली आणि सुप्रिया सुळे सरळ- सोप्या पद्धतीने निवडून आल्या. 

याचीच परतफेड म्हणून शरद पवार यांनी उघडपणे मदत न करता व भविष्यात  आदित्य ठाकरेसाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश घडवून आणला आणि आदित्य ठाकरे यांच्या राजकारणातील एन्ट्रीचा आणि विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. पवारांच्या या अशा राजकीय खेळीमुळेच तर पवारांना तेल लावलेला पैलवान बोलतात. 

असो, तर काल मध्यरात्री मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राज ठाकरेंना आपलं दैवत मानणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि नितीन नांदगावकरांच्या या सेना प्रवेशामागे त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. हो पण फक्त राजकीय स्वार्थापोटी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला नाही हेही तेवढेच खरे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षस्थापानेनंतर 2009 च्या पहिल्याच निवडणुकांमध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले पण त्यानंतर 2014 च्या निवडणुकात हा आकडा आकाशातील तुटत्या ताऱ्याप्रमाणे खाली कोसळला आणि मनसेचा फक्त एकच आमदार निवडून आला आणि या एकमेव आमदाराच्या निवडून येण्यामागे देखील मनसेचा वाटा हा खारीचाच. 2014च्या निवणुकांमध्ये मध्ये मोदी लाटेत मनसेची अवस्था बिकट झाली पण मनसेच्या या परिस्थितीला मोदी लाटेपेक्षा पक्षातील अंतर्गत राजकारण आणि गटबाजी जबाबदार आहे.

राज ठाकरेंनी हाती दिलेला मराठीचा मुद्दा हातात घेऊन आणि अंगावर डजनभर पोलीस केसेस पाडून पक्षासाठी काम करत नितीन नांदगावकरांनी महाराष्ट्रात आपला एक विशेष चाहता वर्ग निर्माण केला आणि राज ठाकरेंनंतर एक पावरफुल मनसे नेता अशी इमेज तयार केली. परंतु, त्यांच्या या वाढत्या प्रसिद्धीमुळे पक्षातील अंतर्गत कुजबुज वाढू लागली आणि त्यावेळेला शिवसेनेत राज ठाकरेंना ज्या प्रकारे डावलण्यात आलं त्या प्रकारे मनसे मध्ये नितीन नांदगावकरांना डावलण्यास सुरवात झाली. आणि याच अंतर्गत गटबाजीला कंटाळून ज्या राज ठाकरेंनी शिवसेना सोडली त्याच गटबाजीला कंटाळून नितीन नांदगावकरांनी हातात शिवबंधन बांधले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News