मैत्रीपण मॅच्युअर होते

  डॉ.संजय नाकाडे, हिंगोली
Sunday, 4 August 2019

जसं पोक्त होऊ
मैत्री पण मॅच्युअर होते
जसं मॅचुअर होऊ 
मैत्री मनसोक्त होते

खिचडी कशीपण शिजो 
मीठ जसं पाहिजे असतं
दुर  कितीही असलो तरी 
मैत्रीचं  नातं जवळचं वाटतं

मैत्री तुझं काम काय रुप काय
काय तयार व्हायची कृती
मोहेंजदारो हारापा पेक्षा
हीच जुनी आणी ग्रेट संस्कृती

संकट पडता कोणी दुजा 
न ये सदैव कामा
तेथे आठवा अर्जुनसखा
कृष्ण अन सुदामा

जसं पोक्त होऊ
मैत्री पण मॅच्युअर होते
जसं मॅचुअर होऊ 
मैत्री मनसोक्त होते

खिचडी कशीपण शिजो 
मीठ जसं पाहिजे असतं
दुर  कितीही असलो तरी 
मैत्रीचं  नातं जवळचं वाटतं

मैत्री तुझं काम काय रुप काय
काय तयार व्हायची कृती
मोहेंजदारो हारापा पेक्षा
हीच जुनी आणी ग्रेट संस्कृती

संकट पडता कोणी दुजा 
न ये सदैव कामा
तेथे आठवा अर्जुनसखा
कृष्ण अन सुदामा

ग मैत्री तुच आमचा खाऊ
तहानल्याचा प्याऊ
या माझ्या प्रिय दोस्तांसाठी 
वारी वारी जाऊं

कुणी म्हणा आइना
कुणी म्हणा दागिना
त्याच्या विना शाळेमधला
कोणताही दिवस सुना

मैत्री च्या व्याख्या करता 
कुंठीत पडते मती
जाणुन घ्यायचं असलच तर
घ्या फक्त अनुभूती

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News