मैत्रीला दिवस नसतोच

स्वाती ठोंबरे
Wednesday, 7 August 2019

खरंच का हो मैत्री दिन 
एक दिवस असतो,
असं अजिबात नाही 
मैत्रीला दिवस असा नसतोच..

खरंच का हो मैत्री दिन 
एक दिवस असतो,
असं अजिबात नाही 
मैत्रीला दिवस असा नसतोच..

मनातील भावना
तोंडातील शिव्या,
बोलणं हक्काचं
मग दिवस एक कशाला..

खरंच तसं काही नसतं
मैत्रीत  दिवस-वेळ नसतं
हक्काने सगळं मैत्रीत असतं
प्रेमाचं रोजचं नातं ते असतं

आपुलकी आणि आनंद
साजरा होतो ह्या डे मधुन,
दिवसभर मनाला आनंद
मिळतो सहज या शुभेच्छातुन

मैत्री संबंध तर कायम
मनात सारे असतात,
दिवस साजरे करतो
कारण आनंद जीवनात मिळतात..

साजरा केला नाही केला
तरी काही मैत्र संबंध
दृढ नक्कीच असतात,
जीवनात अश्या गोष्टींनी
मैत्रीचं नातं द्विगुणित करतात..

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News