'एमआयटी कार्स' बनतेय शेतकऱ्यांचा मित्र 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

एमआयटी-सेंटर फॉर ऍनालॅटिकल रिसर्स ऍण्ड स्टडीज (एमआयटी-कार्स) च्या माध्यमातून ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, फूड टेक्‍नॉलॉजी शाखेतील विद्यार्थी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करत प्रत्यक्ष संशोधनाचे कार्य प्रयोगशाळेत होत आहे.

शेतकऱ्याला हाती मिळतेय जमिनीच्या आरोग्याचे रिपोर्ट कार्ड-

औरंगाबाद- जादाचे उत्पादन शेतकऱ्यांना नेहमीच सुखावते. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतोच. नेमक्‍यावेळी गरज असते, ती योग्य मार्गदर्शनाची. "एमआयटी कार्स'च्या माध्यमातून गरज भागवली जात आहे. इथे आलेल्या शेतकऱ्याला आपल्या जमिनीच्या आरोग्याचे रिपोर्ट कार्डच हाती मिळत आहे. त्यामुळेच एमआयटी कार्स ही प्रयोगशाळा शेतकऱ्यांचा मित्र बनत आहे. 

एमआयटी-सेंटर फॉर ऍनालॅटिकल रिसर्स ऍण्ड स्टडीज (एमआयटी-कार्स) च्या माध्यमातून ऍग्रीकल्चरल इंजिनिअरिंग, फूड टेक्‍नॉलॉजी शाखेतील विद्यार्थी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करत प्रत्यक्ष संशोधनाचे कार्य प्रयोगशाळेत होत आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना झाला पाहिजे, यासाठी एमआयटी विशेष उपक्रम राबवते. प्रयोगशाळेने राष्ट्रीय कृषी विकास योजनेत सहभाग नोंदवून औरंगाबाद जिल्ह्यातील 168 गावांचा मृद सुपिकता निर्देशांक 2009 ते 2099 पर्यंतचा तयार केला आहे. जवळपास एक लाख मृद नमुने तपासून आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना वाटप केल्या आहेत. याची दखल घेत शासनाने अद्ययावत माती आणि पाणी परिक्षण फिरती प्रयोगशाळा मंजूर केली आहे. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन विविध परीक्षण केले जात. परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. 

सेवा अन्‌ मान्यता.. 
प्रयोगशाळेचा याचा लाभ शेतकरी, संशोधक, उद्योजक घेत आहेत. तसेच आयआयटी, नॅशनल ब्युरो, मोसॅन्टो यासह शासकीय, खासगी संस्था व व्यक्‍तींना सेवा पुरवली जात आहे. एनएबीएल, आयएसओ प्रमाणित प्रयोगशाळा असून केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाची मान्यता असलेली देशातील 26 वी तर शैक्षणिक क्षेत्रातील दुसरी प्रयोगशाळा आहे. संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थ्यांमार्फत सुविधा देण्यात येते. 

कृषी क्षेत्रातील वाढत्या गरजा लक्षात घेता प्रयोगशाळेने माती, पाणी याबरोबरच खते, पर्यावरण, अन्न, औषधे अशा क्षेत्रात विश्‍लेषण, प्रशिक्षण आणि संशोधन सुरु आहे. एमआयटी कार्स नावाचे मायक्रो एंटरप्राइज उदयाला आले आहे. अपेडा, एफडीए यांचीही मान्यता घेण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. 
- डॉ. दीपक बोरनारे, उपसंचालक, एमआयटी कार्स. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News