25 हजार सापांना जिवदान देणाऱ्या एका अवलियाचा आगळावेगळा फ्रेंडशिप डे

राजेश दारव्‍हेकर
Sunday, 4 August 2019

विहिरीत पडलेल्या सापाला बाहेर काढून त्‍याला फेंडशीप डेचा बँड बाधून त्‍याच्यासोबत आगळा वेगळा फ्रेंडशीप डे सर्पमित्र विजयराज पाटील यांनी साजरा केला. 

हिंगोली - विहिरीत पडलेल्या सापाला बाहेर काढून त्‍याला फेंडशीप डेचा बँड बाधून त्‍याच्यासोबत आगळा वेगळा फ्रेंडशीप डे सर्पमित्र विजयराज पाटील यांनी साजरा केला. 

सेनगाव तालुक्‍यातील जवळा बुद्रुक येथील रामदास शिंदे यांच्या विहिरीत साप पडल्याची माहिती हिंगोली येथील सर्पमित्र विजयराज पाटील यांना मिळाल्यानंतर त्‍यांनी आनंद चोपडे, सचिन पळसकर, राम पेरिया, सचिन कामखेडे आदी सर्पमित्र सोबत घटनास्‍थळी जाऊन विहिरीतील पाण्यात पडलेल्या साप बाहेर काढला व त्‍याला फ्रेंडशीप डेचा बँड बांधून आगळा वेगळा फेंडशीप डे साजरा केला. 

त्‍यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्यात आले. विजयराज पाटील मागच्या अनेक दिवसांपासून सापासोबत फ्रेंडशीप डे साजरा करतात. अडचणीत असलेल्या सापांना बाहेर काढून त्‍यांना फ्रेंडशीप डेचा बँड बांधून नंतर त्‍याला जंगलात सोडून देतात. 

रविवारी देखील त्‍यांना विहिरीत साप पडल्याची माहिती मिळाल्याने व आज फ्रेंडशीप डे असल्याने त्‍यांनी इतर  सर्पमित्रांसोबत घटनास्‍थळी जाऊन अडचणीत असलेल्या सापाला विहिरीच्या बाहेर काढले. आतापर्यंत श्री. पाटील यांनी पंचवीस हजार सापांना पकडून जंगलात सोडून त्‍यांना जीवदान दिले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News