फ्रेश ॲण्ड मॉर्निंग ड्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019

या प्रकारचा मेकअप सकाळी खूप छान दिसतो. कमीत कमी फाऊंडेशन व वॉटरप्रूफ मस्कारा डोळ्याला लावावा.

या प्रकारचा मेकअप सकाळी खूप छान दिसतो. कमीत कमी फाऊंडेशन व वॉटरप्रूफ मस्कारा डोळ्याला लावावा. गालाला हलकेच रंगवा व ओठांना कोरल लिपग्लॉस लावा.

द नियॉन इफेक्‍ट :  
पावसाळ्यात आपली त्वचा डिहायड्रेटेड असणे आवश्‍यक असते. तसेच वॉटरप्रूफ मेकअप करणे पण तेवढेच महत्त्वाचे. डोळ्यांना जास्त मेकअप न करता साधा वॉटरप्रूफ मस्काऱ्याचा एक कोट लावा. गालांना पण थोडाच मेकअप करा. ओठांना मात्र ब्राइट नियॉन रंगाची लिपस्टिक लावा. हा मेकअप दिवसभर टिकेल.

फंक ॲण्ड फन : 
डोळ्यांभोवतालची काळी वर्तुळे किंवा चेहऱ्यावरचे काळे डाग झाकण्यासाठी चेहऱ्याला कन्सिलर लावा. त्याचबरोबर रंगीबिरंगी आयपेन्सिलही लावू शकता. डोळ्यांच्या कोपऱ्याला स्मोकी लूक देऊ शकता. निळ्या, हिरव्या, गुलाबी व नारंगी रंगांचे कपडे अशा मेकअपवर शोभून दिसतात. गालाला पण हलकाच मेकअप करावा व ओठांनादेखील थोडीशी लिपस्टिक लावावी.

स्मोक इन हॉट : 
हा मेकअप संध्याकाळसाठी आहे. डोळ्यांच्या पापण्यांवर, डोळ्यांखाली व डोळ्यांच्या कोनांना डार्क ब्राऊन रंगाची आयशॉडो लावावी. तुम्ही हिरव्या रंगाचा प्रयोगदेखील करू शकता. मॉन्सून स्पेशल हिरवा रंग हा या वर्षाचा नवीन रंग आहे. डोळ्यांच्या पापण्यांवर किंचित व्हाईट गोल्ड शिमर वापरा. ज्यामुळे डोळ्यांचा मेकअप उठून दिसेल.

अधिक उठावदार बनवण्यासाठी काळ्या रंगाचे वॉटरप्रूफ काजळ व मस्कारा लावावा. हे केल्यास डोळे खूप सुंदर दिसतात. हलक्‍या गुलाबी रंगाचे रुज गालाला लावावे. तसेच फिक्‍या रंगाची लिपस्टिक लावल्यास हा मेकअप खुलून दिसेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News