बॅंकिंग परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य चर्चासत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

विद्यार्थ्यांना बॅंकिंग क्षेत्रातील करिअर संधींबद्दल, बॅंकिंगच्या ३० वेगवेगळ्या परीक्षांबद्दल व परीक्षांच्या पॅटर्नबद्दल माहिती देण्यात येईल.

पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’ चा शैक्षणिक विभाग असणाऱ्या ‘एपीजी लर्निंग’ ने एसबीआय-पीओ, आयबीपीएस-पीओ, आयबीपीएस-एसओ, आयबीपीएस-एओ, आयबीपीएस-क्‍लार्क, एसएससी-सीजीएल, आरआरबी-पीओ, आरआरबी-क्‍लार्क, आरबीआय (ग्रेड बी ऑफिसर्स) आदी परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना सर्वोत्तम प्रशिक्षण मिळावे, यासाठी पुढाकार घेतला आहे. 

या परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असल्या, तरी अनेक उदयोन्मुख व हुशार उमेदवारांना परीक्षाभिमुख व बदलत्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण मिळत नाही. या पार्श्वभूमीवर एपीजी लर्निंगने आयोजित केलेल्या ‘बॅंकिंग परीक्षांची तयारी कशी करावी’ या विषयावरील विनामूल्य चर्चासत्रात बॅंकिंग परीक्षांमध्ये अनेकवेळा यश मिळविलेले अनुभवी प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.

चर्चासत्रात विद्यार्थ्यांना बॅंकिंग क्षेत्रातील करिअर संधींबद्दल, बॅंकिंगच्या ३० वेगवेगळ्या परीक्षांबद्दल व परीक्षांच्या पॅटर्नबद्दल माहिती देण्यात येईल. विविध संधी उपलब्ध असल्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओ या शीर्ष परीक्षांमध्ये यश कसे मिळवायचे;

तसेच परीक्षेसाठीचे आवश्‍यक ज्ञान व कौशल्ये, यशस्वी होण्यासाठीच्या स्ट्रॅटेजी व टॅक्‍टिक्‍स याबद्दल माहिती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात येईल. हे चर्चासत्र येत्या रविवारी (ता.१४) सकाळी १० ते ११.३० या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९१३००७०१३२.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News