आनंदी महाविद्यालयात दशकपूर्तीनिमित्त मोफत शिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य, प्रवासासाठी लागणारे पास, पोशाख इतर बाबींचा खर्च संस्था स्वतः करणार आहे.

पुनाळ: कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथील आनंदी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गरजूंना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. आनंदी महाविद्यालयाच्या दशकपूर्तीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांनी शहीद जवान, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या अपत्यांना व अनाथ विद्यार्थ्यांना आनंदी महाविद्यालयात संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण (बी.ए., बी कॉम., बी. एस्सी.) मोफत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 

तसेच या विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य, प्रवासासाठी लागणारे पास, पोशाख इतर बाबींचा खर्च संस्था स्वतः करणार आहे. १३ जुलैस महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी दत्तक योजनेबरोबरच महाविद्यालयीन शिक्षण, व्यावसायिक शिक्षण देणारे प्रमाणपत्र कोर्सेसही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एन. व्ही. शहा यांनी दिली. सर्व संबंधितांनी याची नोंद घेऊन महाविद्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन संस्थाध्यक्ष प्रा. सतीश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई यांनी केले आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News