नवीन बसपास मिळेपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाने अखेर विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

बेळगाव - कर्नाटक राज्य मार्ग परिवहन मंडळाने अखेर विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. नवीन बसपास मिळेपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसा नवीन सुधारित आदेश कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य वाहतूक व्यवस्थापकांनी बजाविला आहे.

या आदेशात त्यांनी बसवाहक आणि चालकांना विद्यार्थ्यांचे ओळखपत्र व प्रवेश शुल्क पावती पाहून त्यांना प्रवास करू द्यावा, अशी सूचना केली आहे.
अकरावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांचे जुने बसपास नाहीत, अशा प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना तिकिटे काढून प्रवास करावा लागत होता. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही नवीन बसपास देण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही. करणे शक्‍य नव्हते. बसपासअभावी व आर्थिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थी शाळा-कॉलेजला येत नव्हते. 
परिणामी, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.

नवीन बसपास मिळेपर्यंत साऱ्या विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवास करण्याची सुविधा देण्याची मागणी विद्यार्थी व पालकवर्गातून होत होती. ‘सकाळ’ने या साऱ्या अडचणी मांडल्या होत्या.विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अखेर मुख्य वाहतूक व्यवस्थापकांनी नवीन आदेश काढून शाळा-महाविद्यालयांत प्रवेश घेतलेली प्रवेश शुल्क पावती व शाळा-महाविद्यालयांचे ओळखपत्र दाखवून मोफत प्रवेश करण्याची सुविधा दिली.

त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळली असून आता शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्याची शक्‍यता आहे.परिवहन महामंडळाच्या पहिल्या आदेशात जुने बसपास असलेल्या विद्यार्थ्यांनाच सवलत होती. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची सोय झाली. मात्र, नव्याने अकरावीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोज तिकीट काढून यावे-जावे लागत होते.

आता दुसऱ्या सुधारित आदेशानुसार प्रवेश शुल्क पावती व महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखवून विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले आहे.
-प्राचार्य आर. डी. शेलार, ज्योती महाविद्यालय, बेळगाव

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News