सिद्धिविनायक वसतिगृहात विद्यार्थिनींना मोफत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

निल्लोड:  माणिकनगर, भवन (ता. सिल्लोड) येथील श्री. सिद्धिविनायक मुलींच्या वसतिगृहामध्ये २०१९-२० या चालू शैक्षणिक वर्षासाठी पाचवी ते दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवेश देण्यासाठी प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

निल्लोड:  माणिकनगर, भवन (ता. सिल्लोड) येथील श्री. सिद्धिविनायक मुलींच्या वसतिगृहामध्ये २०१९-२० या चालू शैक्षणिक वर्षासाठी पाचवी ते दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत प्रवेश देण्यासाठी प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

श्री. सिद्धिविनायक संस्थेतर्फे मोफत चालविल्या जाणाऱ्या या वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना शिक्षणासह, नाष्टा, दोन वेळचे जेवण, निवास, शालेय पुस्तके, अंथरूण, ग्रंथालय, क्रीडा साहित्य, प्राथमिक उपचार, वेगळा अभ्यासवर्ग, मनोरंजनात्मक, बौद्धिक साहित्य, संगणक प्रशिक्षण, अभ्यासिका आदी सुविधा मोफत पुरविल्या जातात.

शैक्षणिक प्रगती करणाऱ्या मुलींना कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सुविधा, प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जातात. वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक ऊसतोड कामगार, आत्महत्याग्रस्त, गरीब, अनाथ, मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थिनींनी त्वरित प्रवेश अर्ज करावा. पाचवीच्या विद्यार्थिनींना विशेष प्राधान्य दिले जाणार असून, प्रवेश अर्ज, वसतिगृह प्रवेश एकाच वेळी सुरू करण्यात आले आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी ०२४३०-२३००३०, ८५५४८५९१७८, ९०२२३२७०२२ व ९४२०१३०७३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या अधीक्षिका मनीषा बिडवे (बोराडे) यांनी केले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News