एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठीचे विविध मार्ग मोकळे

हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक
Wednesday, 8 May 2019

देशभरातील शासकीय, खासगी व अभिमत विद्यापीठांतून उपलब्ध होणाऱ्या एमबीबीएस शाखेच्या सुमारे ४९७ महाविद्यालयांतून ६१ हजार जागांवरील, तसेच सुमारे ३१३ महाविद्यालयांमधील बीडीएस शाखेतील २७ हजार जागांवरील प्रवेश ‘नीट-२०१९’ या एकाच परीक्षेतील गुणांच्या आधारे देण्यात येणाऱ्या मेरिट क्रमांकानुसार होणार आहेत.

देशभरातील शासकीय, खासगी व अभिमत विद्यापीठांतून उपलब्ध होणाऱ्या एमबीबीएस शाखेच्या सुमारे ४९७ महाविद्यालयांतून ६१ हजार जागांवरील, तसेच सुमारे ३१३ महाविद्यालयांमधील बीडीएस शाखेतील २७ हजार जागांवरील प्रवेश ‘नीट-२०१९’ या एकाच परीक्षेतील गुणांच्या आधारे देण्यात येणाऱ्या मेरिट क्रमांकानुसार होणार आहेत. (एआयआयएमएस - एम्स व जीपमर संस्था वगळून) महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान शाखेतील बीएएमएस, बीएचएमएससह उर्वरित शाखांचे प्रवेश मागील दोन वर्षापासून ‘नीट’मधूनच होत होते. मात्र, २०१९पासून देशभरातील सर्व राज्यांतील प्रवेशासाठी ‘नीट-२०१९’ ही ‘आयुष’तर्फे लागू केली आहे.

ऑल इंडिया १५ टक्के कोटा ः देशभरातील एमबीबीएस, बीडीएस शाखेतील शासकीय महाविद्यालयातील १५ टक्के जागांवरील प्रवेश ‘नीट-२०१९’ परीक्षेतून प्राप्त होणाऱ्या ऑल इंडिया कोट्यानुसार (एआयक्‍यू) देण्यात येतात. यामध्ये १५ टक्के कोट्यातून देशभरातील एमबीबीएस शाखेच्या सुमारे १९३ शासकीय महाविद्यालयातून ४१०० जागा, तसेच बीडीएस शाखेच्या सुमारे ३७ शासकीय महाविद्यालयातून ३३० जागा उपलब्ध होतात. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ही एमसीसी - मेडिकल कौन्सिलिंग कमिटीतर्फे www.mcc.nic.in या संकेतस्थळावरून दोन फेऱ्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. महाराष्ट्रातील विद्यार्थी या प्रवेशप्रक्रियेत सामील होऊन देशभरातील महाविद्यालयांबरोबरच राज्यातील शासकीय महाविद्यालयातही १५ टक्‍क्‍यांतून प्रवेश घेऊ शकतो. दोन प्रवेश फेऱ्या संपल्यानंतर रिक्त जागा संबंधित राज्याकडे वर्ग केल्या जातात.

८५ टक्के राज्यस्तरीय कोटा : महाराष्ट्र राज्यातील शासकीय, शासन अनुदानित व खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस, बीडीएस शाखेतील ८ टक्के कोट्यातील प्रवेश राज्यातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून नावनोंदणी करून ‘नीट’च्या ऑल इंडिया रॅंकच्या आधारे राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणानुक्रमांकाचे वाटप करून त्याद्वारे दिले जातात. संपूर्ण प्रवेशप्रक्रिया राज्याच्या सीईटी सेलअंतर्गत डीएमईआर मुंबईमार्फत संकेतस्थळावरून ऑनलाइन पसंतीक्रम नोंदवून राबवली जाते. याच प्रवेश प्रक्रियेतून राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयातील बीएएमएस, बीएचएमएससह उर्वरित सर्व शाखांचे प्रवेश एकत्रित पसंतीक्रम नोंदवितात.

अभिमत महाविद्यालयाचे प्रवेश : देशभरातील सर्व अभिमत विद्यापीठातील एमबीबीएस शाखेच्या सुमारे ४३ संस्थांमधील ६८०० जागा व बीडीएस शाखेच्या सुमारे ३४ संस्थांमधून ३३०० जागांवरील प्रवेश ‘नीट’ परीक्षेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या ऑल इंडिया रॅंकनुसार (एआयआर) होतात. प्रवेश प्रक्रिया डीजीएचएसतर्फे एमसीसीच्या www.mcc.nic.in या संकेतस्थळावरून राबविली जाते. प्रवेशाच्या तीन फेऱ्या होतात. 

राज्यातील खासगी महाविद्यालयातील १५ टक्के एनआरआय जागा या पहिल्यांदा पसंतीक्रम भरून राज्य शासनामार्फत भरल्या जातात. यामध्ये प्रथम येणारा विद्यार्थी व त्यानंतर ‘अगेन्स्ट एनआरआय’ म्हणजे एनआरआय व्यतिरिक्त सर्वसाधारण विद्यार्थी व त्यानंतरही जागा शिल्लक राहिल्यास खासगी संस्थांमधून भरल्या जातात. वर्ध्यातील एमजेआयएमएस येथील ५० टक्के जागा राज्य शासनाच्या प्रवेश प्रक्रियेतून, तर उर्वरित ५० टक्के जागा पंधरा टक्के ऑल इंडिया रॅंकच्या प्रवेश प्रक्रियेतून पसंतीक्रम नोंदवून भरल्या जातात. 

एएफएमसीमधील प्रवेशप्रक्रिया : मेडिकल कौन्सिलच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करून, त्यांच्यातर्फे सुमारे १५००ची निवड यादी एएफएमसीकडे पाठवली जाते. एएफएमसीतर्फे स्वतंत्र परीक्षा घेतली जाते, तसेच वैद्यकीय तपासणी व मुलाखत यानुसार अंतिम प्रवेश दिले जातात. एम्स व ‘जीपमर’तर्फे स्वतंत्र प्रवेश परीक्षा असून, मेरिट क्रमांकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. २०१८ मध्ये १५ टक्के ऑल इंडिया कोटा, ४५ टक्के अभिमत विद्यापीठ व सेंट्रल विद्यापीठ यांची प्रवेश प्रक्रिया एकत्रित पसंतीक्रम भरून राबविण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News