चार कोचिंग क्लास सील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

सुरत येथील कोचिंग क्लासच्या आगीच्या प्रकरणानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभिर्याने घेत सोमवारपासून कठोर कारवाई सुरू केली.

अकोला - सुरत येथील कोचिंग क्लासच्या आगीच्या प्रकरणानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभिर्याने घेत सोमवारपासून कठोर कारवाई सुरू केली.

पहिल्याच दिवसी चार क्लासेस सील करण्यात आले.   शहरातील अनेक कोचिंग क्लासेस निव्वळ कमाईच्या मागे लागले असून, विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

असे असतानाही ६४ पैकी केवळ २० कोचिंग क्लासेसमध्ये अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात अाल्याची माहिती देण्यात अाली अाहे. तर सूचना देऊनही उपाय योजना न करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या संचालकाना सात दिवसांची मुदत ३१ मेपर्यंत देण्यात अाली होती.

या क्लासेसवर कारवाई
अग्निशमन विभागातर्फे कोचिंग क्‍लासवर सोमवारपासून कारवाई करण्यात आली. त्यात आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना व भारत बांधकाम संहितेनुसार कोणतीही कार्यवाही केली नसलेल्या कोचिंग क्‍लासेसचा समावेश आहे. पहिल्या दिवशी कारवाई करण्यात आलेल्या क्लासेसमध्ये  प्रा. अजय कुटे अॅकॅडमी, आकाशवाणी मागे तसेच तोष्‍णीवाल ले-आउट, शास्‍त्री नगर येथील प्रा. प्रशांत देशमुख यांच्या सरस्‍वती कोचिंग क्‍लास, प्रा. अजरांबर गावंडे यांचा युनिक कोचिंग क्‍लास, प्रा. पाध्ये यांच्या आकाश एज्‍युकेशन कोचिंग क्‍लासचा समावेश आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News