सुकलेले धान पऱ्हे पाहून शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • शंकरपुरातील घटना; कर्जाच्या विवंचनेत संपविले जीवन

शंकरपूर: गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही. पावसाअभावी पिके सुकत चालली आहे. शेतातील सुकलेले धानाचे प-हे बघून एका शेतक-याने शेतात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. रवींद्र संभाजी लहाने (वय ४८) असे मृत शेतक-याचे नाव आहे. 

ही घटना सोमवारी (ता. २२) रात्रीच्या सुमारास घडली. रवींद्र संभाजी लहाने यांची शंकरपुरात शेती आहे. खरीप हंगामात त्यांनी धान लावले. जून महिन्यात थोडा पाऊस झाला. या पावसाच्या भरवशावर त्यांनी धान लावले. मात्र, जून, जुलै  महिन्यात पाऊस झाला नाही. सिंचनाची सुविधा नाही. त्यामुळे धानाचे प-हे सुकत चालले होते. सोमवारी (ता. २२) रवींद्र लहाने सकाळी शेतावर गेले. मात्र, रात्री आठ वाजतापर्यंत घरी परतले नाही. त्यामुळे घरच्यांनी त्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यांच्या शेताच्या बाजूनेच विहिर आहे. याच विहिरीत त्यांचा मूतदेह आढळून आला. 

त्याच्यांवर बँक व खासगी बँकेचे कर्ज होते. दररोज ते शेतावर जात होते. पाण्याअभावी धान प-हे सुकत चालल्याचे बघून ते अस्वस्थ होते. पावसाअभावी शेतीच पिकणार नसल्यामुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना होती.

आधीच त्यांनी मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढले होते. त्यात शेतीसाठी त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जाच्या चितेत त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शंकरपूर पोलिसांनी मार्ग दाखल केला आहे. तलाठी आत्राम यांनी पंचनामा केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News