माजी आयएएस अधिकारी नजरकैदेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019

श्रीनगर: पीपल्स मुव्हमेंट पार्टीचे तरुण अध्यक्ष तथा माजी आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी कलम ३७० हटविण्याच्या निर्णयावर एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, ‘सरकारच्या या निर्णयानंतर आता दोनच पर्याय राहिले आहेत. एक तर तुम्ही सरकारच्या हातातील खेळणे बना किंवा फुटीरतावादी व्हा. याशिवाय आता कोणताही मार्ग राहिलेला नाही.’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन माजी आयएएस अधिकारी शाह फैसल यांना श्रीनगरमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या शाह फैसल श्रीनगरच्या सेंटर हॉटेलमध्ये असून, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

श्रीनगर: पीपल्स मुव्हमेंट पार्टीचे तरुण अध्यक्ष तथा माजी आयएएस अधिकारी शाह फैसल यांनी कलम ३७० हटविण्याच्या निर्णयावर एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, ‘सरकारच्या या निर्णयानंतर आता दोनच पर्याय राहिले आहेत. एक तर तुम्ही सरकारच्या हातातील खेळणे बना किंवा फुटीरतावादी व्हा. याशिवाय आता कोणताही मार्ग राहिलेला नाही.’ असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन माजी आयएएस अधिकारी शाह फैसल यांना श्रीनगरमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या शाह फैसल श्रीनगरच्या सेंटर हॉटेलमध्ये असून, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आता घरातून त्यांची रवानगी हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना पुन्हा काश्मीरला पाठवण्यात आले होते. 
 
मंगळवारी माजी आयएएस अधिकारी शाह फैसल विदेशात जात होते. सार्वजनिक सुरक्षा अधिनियम अंतर्गत त्यांना दिल्ली विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशी करण्यात आली. इस्तंबूलहून लंडनसाठी कनेक्टिंग फ्लाइट घेऊन जाणार होतो, अशी माहिती फैसल यांनी दिली होती. 

फैसल यांनी (ता.१२) एक ट्वीट केले होते. त्यात ते असं म्हणाले की, 'सरकारच्या या निर्णयावर काश्मीरची जनता अश्रू ढाळत आहे, असं म्हटलं होतं. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, जगभरात बकरी ईदचा उत्साह आहे. पण, काश्मीरची जनता सरकारच्या निर्णयवर रडत आहे. जोपर्यंत १९४७मध्ये मिळालेला विशेष राज्याचा दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत काश्मीरमध्ये ईद साजरी केली जाणार नाही.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News